Virat Kohli Confronts Fourth Umpire Over Controversial Rajat Patidar Dismissal : आयपीएल २०२६ स्पर्धेत गुरुवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यात टेलिव्हिजन अंपायरच्या निर्णयावरुन वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. नाणेफेक जिंकून शुभमन गिलनं गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर गुजरातच्या गोलंदाजांनी जेकॉब बेथल ५ (५) आणि विराट कोहली २८ (१३) या दोन्ही सलामीवीरांना पॉवर प्लेमध्येच तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदारच्या रुपात आरसीबीनं तिसरी विकेट गमावली. जेसन होल्डरनं घेतलेला झेल योग्य नाही, असा आक्षेप घेत विराट कोहली सीमारेषेच्या बाहेर पंचांशी हुज्जत घालताना दिसला. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जेसन होल्डरचा झेल अन् पंचाच्या निर्णय ठरला वादग्रस्त
RCB च्या डावातील आठव्या षटकात अर्शद खानच्या गोलंदाजीवर रजत पाटीदारनं एक मोठा फटका खेळला. पण जेसन होल्डरने कमालीचा झेल टिपत १९ धावांवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कर्णधाराचा खेळ खल्लास केला. हा झेल टिपताना चेंडू जमीनीला स्पर्श झाला का? असा प्रश्न निर्माण झाला. टेलिव्हिजन अंपायरने रिप्ले पाहिल्यावर मैदानातील पंचांचा निर्णय कायम ठेवला. या निर्णयावर विराट कोहलीला पटला नाही. जेसन होल्डरन कॅच घेतल्यावर चेंडू जमिनीला स्पर्श झाल्याचे सांगत पंचांसोबत हुज्जत घालताना दिसला.
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
विराट कोहलीची नाराजी, कारवाई होणार?
विराट कोहलीनं या सामन्यात संघाला दमदार सुरुवात करून दिली. पॉवरप्लेमध्ये १३ चेंडूत २८ धावा करून तो बाद झाला. संघ अडचणीत असताना रजत पाटीदारकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असताना मोक्याच्या क्षणी तो बाद झाल्यावर विराट कोहलीनं पंचांच्या निर्णयावर हस्तक्षेप नोंदवला. त्याने नाराजी व्यक्त केली, पण पंचांनी निर्णय कायम ठेवल्याने RCB च्या संघाला ७९ धावांवर तिसरा धक्का बसला. कोहलीनं पंचांशी हुज्जत घातल्यामुळे त्याच्यावर कारवाई होणार का? हा प्रश्नही उपस्थितीत होत आहे.