पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 23:39 IST2026-04-30T23:37:50+5:302026-04-30T23:39:20+5:30
Mamata Banerjee EVM Tampering Allegation : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर येथील 'स्ट्राँग रूम'मधील ईव्हीएम (EVM) मशीनसोबत छेडछाड झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर कोलकात्यात तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चकमकही उड्याल्याचे दिसून आले आणि अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपली आहे. यावेळच्या निवडणुकीत जनतेने उत्स्फूर्त सहभाग घेत विक्रमी मतदान केले. यानंतर आलेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजप सत्तेत येण्याचा आणि ममता दिदींची खुर्ची जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशी एकूण परिस्थिती असतानाच, पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण आता जबरदस्त तापाताना दिसत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर येथील 'स्ट्राँग रूम'मधील ईव्हीएम (EVM) मशीनसोबत छेडछाड झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर कोलकात्यात तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चकमकही उड्याल्याचे दिसून आले आणि अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी गुरुवारी थेट भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील स्ट्राँग रूमवर धडकल्या. ही स्ट्राँग रूम दक्षिण कोलकात्यातील सखावत मेमोरियल स्कूलमध्ये तयार करण्यात आली आहे. या रूममध्ये २९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाचे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे, भरपावसात ममता या ठिकाणी पोहोचल्या. यावेळी त्यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड होत असल्याचा आरोप केला.
❗️ALARMING❗️
— All India Trinamool Congress (@AITCofficial) April 30, 2026
This is the murder of democracy in broad daylight.
CCTV footage has exposed how @BJP4India, in active collusion with the @ECISVEEP, is opening ballot boxes without the presence of any relevant party stakeholders. This is gross electoral fraud being committed openly… pic.twitter.com/aSe36kGKPI
कुणाल घोष आणि शशी पांजा यांचे धरणे -
दरम्यान, कोलकात्याचे महापौर फिरहाद हाकीम हे देखील तेथे पोहोचले. मात्र त्यांची आणि ममतांची भेट झाली नाही. फिरहाद म्हणाले, "ममता बॅनर्जी उमेदवार म्हणून आपल्या निवडणूक एजंटसह आत गेल्या होत्या. मला आत जाण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुले आत काय सुरू आहे, यासंदरभात मी काहीही सांगू शकत नाही. याशिवाय, तृणमूलचे वरिष्ठ नेते कुणाल घोष आणि शशी पांजा यांनी खुदीराम अनुशीलन केंद्राबाहेर धरणे आंदोलन सुरू केले होते. येथे ठेवलेल्या ईव्हीएमसोबत गैरप्रकार केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
काय म्हणाले कुणाल घोष? -
दरम्यान, कुणाल घोष यांनी प्रशासकीय कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत, "दुपारी साडेतीन वाजेपर्यंत आमचे कार्यकर्ते बाहेर होते, मात्र अचानक ईमेलद्वारे कळवण्यात आले की ४ वाजता स्ट्राँग रूम उघडली जाईल. आम्हाला आत प्रवेश नाकारला. भाजपला मात्र बोलावले जात आहे." त्यांनी लाईव्ह स्ट्रीमिंगमध्येही बिघाड असल्याचा दावा केला. शशी पांजा यांनीही नियमावलीवर बोट ठेवत, स्ट्राँग रूम उघडण्यापूर्वी सर्व पक्षांना पूर्वसूचना का दिली गेली नाही? असा प्रश्न उपस्थित केला.
#WATCH | पश्चिम बंगाल चुनाव 2026 | कोलकाता: TMC नेता शशि पांजा और कुणाल घोष नेताजी इंडोर स्टेडियम के बाहर स्ट्रॉन्ग रूम के सामने धरने पर बैठे हैं।
— ANI_HindiNews (@AHindinews) April 30, 2026
उन्होंने आरोप लगाया कि BJP और ECI अधिकारी पार्टी के संबंधित प्रतिनिधियों की मौजूदगी के बिना बैलेट बॉक्स खोलने की कोशिश कर रहे हैं।… pic.twitter.com/iYU5DJwfgH
चौरंगी परिसरात संघर्ष -
याचे पडसाद कोलकात्याच्या चौरंगी भागातही उमटले. स्ट्राँग रूम बाहेर भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे समर्थक आपापसात भिडले. भाजप नेते तपस रॉय घटनास्थळी पोहोचल्यानंतर अधिकच तणाव निर्माण झाला. परिस्थिती एवढी बिघडली की शेवटी सुरक्षा दलांना हस्तक्षेप करावा लागला आणि परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
टीएमसीच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं उत्तर -
टीएमसीने केलेल्या आरोपांना निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. आयोगाने तृणमूल काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत. "स्ट्रॉन्ग रूम पूर्णपणे सुरक्षित असून त्यात कोणत्याही प्रकारची छेडछाड झालेली नाही. खुदीराम अनुशीलन केंद्र परिसरात ७ विधानसभा क्षेत्रांचे स्ट्रॉन्ग रूम आहेत. मतदान संपल्यानंतर उमेदवार, त्यांचे एजंट आणि निरीक्षकांच्या उपस्थितीत हे कक्ष सील करण्यात आले होते. शेवटचा स्ट्रॉन्ग रूम पहाटे ५:१५ वाजता बंद झाला होता."
ECI अधिकारियों ने बताया -
— ANI_HindiNews (@AHindinews) April 30, 2026
1. खुदीराम अनुशीलन केंद्र के अंदर 7 AC स्ट्रॉन्ग रूम हैं।
2. कल मतदान पूरा होने के बाद कैंडिडेट्स/इलेक्शन एजेंट्स और जनरल ऑब्जर्वर की मौजूदगी में उन सभी को ठीक से बंद और सील कर दिया गया है। आखिरी स्ट्रॉन्ग रूम सुबह करीब 5.15 बजे बंद कर दिया गया था।
3.… https://t.co/MvcYIMNVMa
मुख्य स्ट्रॉन्ग रूम पूर्णपणे बंद आणि सुरक्षित, पोस्टल बॅलेटची प्रक्रिया वेगळी -
आयोगाने पुढे म्हटले आहे, "त्याच परिसरात पोस्टल बॅलेटसाठी स्वतंत्र कक्ष आहे. ज्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला गेला, ती पोस्टल बॅलेटच्या वर्गीकरणाची प्रक्रिया होती आणि ती स्ट्रॉन्ग रूमच्या कॉरिडॉरमध्ये सुरू होती. या प्रक्रियेची माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे आधीच देण्यात आली होती." एवढेच नाही तर, "मुख्य स्ट्रॉन्ग रूम पूर्णपणे बंद आणि सुरक्षित आहेत, याची खात्री शशी पांजा आणि कुणाल घोष यांनाही करून देण्यात आली आहे," असे आयोगाने नमूद केले.