Gujarat Titans won by 4 wkts Royal Challengers Bengaluru : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सच्या संघाने गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभवाचा धक्का दिला. पहिल्यांदा फलंदाजी करताना बंगळुरुचा संघ १५५ धावांवर ऑलआउट झाला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना 'प्रिन्स' शुभमन गिलनं तुफान फटकेबाजी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. भुवीच्या गोलंदाजीवर त्याला झेलबाद केल्यावर किंग कोहलीनं एकच जल्लोष केला. पण शेवटी गुजरात टायटन्सच्या संघाने ४ विकेट्स आणि २५ चेंडू राखून सामना खिशात घातला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विराट कोहली आक्रमक सुरुवात करुन देत पॉवर प्लेमध्ये माघारी
शुभमन गिलनं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर जेकब बेथल आणि विराट कोहली या जोडीनं RCB च्या डावाची सुरुवात केली. जेकब बेथल अवघ्या ५ धावा करून माघारी फिरला. विराट कोहलीनं दुसऱ्या षटकात रबाडाच्या एकाच षटकात सलग ५ चौकार मारून आक्रमक फलंदाजीचा नजराणा पेश केला. पण तिसऱ्या षटकात १३ चेंडूत २८ धावांवर रबाडानेच त्याच्या खेळीला ब्रेक लावला.
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
RCB कडून देवदत्त पडिक्कल ठरला टॉपर
सलामीवीर माघारी फिरल्यावर देवदत्त पडिक्कलनं आश्वासक आणि दमदार खेळी करताना २४ चेंडूत केलेल्या ४० धावा आणि कर्णधार रजत पाटीदारनं १५ चेंडूत १९ धावा करत संघाचा डाव सावरणारी खेळी केली. अखेरच्या षटकात रोमारिया शेफर्ड १७ (१५), व्यंकटेश अय्यर १२ (१५) आणि भुवनेश्वर कुमारनं १५ चेंडूत केलेल्या १५ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने १९.२ षटकात सर्व बाद ११५ धावा केल्या. गुजरातकडून अर्शद खान याने सर्वाधिक ३ तर राशीद खान आणि जेसन होल्डरने प्रत्येकी २-२ आणि मोहम्मद सिराज आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.
शुभमन गिलचा धमाकेदार फलंदाजी अन्...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना शुभमन गिलनं २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटसह फलंदाजी करताना १८ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४३ धावांची खेळी करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. साई सुदर्शनच्या रुपात भुवनेश्वर कुमारनं RCB ला पहिले यश मिळवून दिले. पॉवर प्लेमध्ये भुवीनेच आक्रमक अंदाजात फटकेबाजी करणाऱ्या गिलच्या खेळीला ब्रेक लावला. त्याचा झेल टिपल्यावर विराट कोहलीनं एकच जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले.
सलामी जोडी तंबूत परतल्यावर १९ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ३९ धावांवर खेळणाऱ्या जोस बटलरला भुवीनं क्लीन बोल्ड केले. पण शेवटी गुजरातच्या संघाने पुन्हा एकदा भुवनेश्वर RCB च्या मदतीला धावला. त्याने जोस बटलरच्या खेळीला ब्रेक लावला. पण तोपर्यंत सामना RCB च्या हातून निसटला होता. जेसन होल्डर १० चेंडूत १२ धावा करून परतल्यावर राहुल तेवतिया २७ (१७) आणि राशीद खान ७ (६) जोडीनं १६ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मॅच संपवली.