बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 15:11 IST2026-04-30T15:11:23+5:302026-04-30T15:11:44+5:30

वैशाली जिल्ह्यात एका दोन मुलांच्या आईने आपल्या प्रेमासाठी जे काही केले, त्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

A mother of 2 was romancing her boyfriend in the garden, the villagers saw the two and then did something like this... | बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...

बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...

सोशल मीडियाच्या या जमान्यात प्रेमाला वयाचे किंवा नात्याचे बंधन उरले नसल्याचे अनेक किस्से समोर येतात. मात्र, बिहारच्या वैशाली जिल्ह्यात एका दोन मुलांच्या आईने आपल्या प्रेमासाठी जे काही केले, त्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. इन्स्टाग्रामवर झालेल्या प्रेमापोटी ही महिला आपल्या प्रियकरासोबत बागेत रोमान्स करताना गावकऱ्यांच्या तावडीत सापडली. त्यानंतर गावकऱ्यांनी जे केले, त्याची चर्चा आता सगळीकडेच होत आहे.

नेमकं काय घडलं?

पातेपुर येथील रहिवासी असलेल्या खुशी कुमारी हिचे लग्न २०२२ मध्ये राजीव पासवान यांच्याशी झाले होते. त्यांना दोन लहान मुलेही आहेत. मात्र, वर्षभरापूर्वी खुशीची ओळख इन्स्टाग्रामवर परदेशी कुमार नावाच्या तरुणाशी झाली. ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले आणि ही दोन मुलांची आई संसाराचा विसर पडून प्रियकराच्या प्रेमात बुडाली.

बागेत रंगेहात पकडलं अन्...

बुधवारी संध्याकाळी खुशी आणि परदेशी हे पातेपुरमधील एका आमराईत चोरून भेटत होते. दोघेही आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी दोघांनाही रंगेहात पकडले. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी जमली आणि हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला. प्रकरण पोलिसात नेण्याऐवजी किंवा वाद घालण्याऐवजी गावकऱ्यांनी एक अजब निर्णय घेतला. त्यांनी या प्रेमी युगुलाला थेट छपकी पोखर येथील मंदिरात नेले आणि तिथेच त्यांचा विवाह लावून दिला.

पतीची रोकठोक भूमिका

या घटनेची माहिती मिळताच खुशीचा पती राजीव तिथे पोहोचला. पत्नीचा हा अवतार पाहून त्याने तिला स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. "जर माझ्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबतच राहायचे आहे आणि तो तिला सांभाळायला तयार आहे, तर मला आता तिच्याशी काहीही देणेघेणे नाही," अशी खंबीर भूमिका राजीवने घेतली. दुसरीकडे, खुशीनेही आपल्या दोन मुलांचा विचार न करता प्रियकरासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title : बाग में प्रेमी संग रोमांस करती पकड़ी गई विवाहित महिला, ग्रामीणों ने कराई शादी।

Web Summary : बिहार में एक विवाहित महिला इंस्टाग्राम पर अफेयर के चलते प्रेमी के साथ पकड़ी गई। ग्रामीणों ने मंदिर में उनकी शादी करा दी। पति ने उसे स्वीकार करने से इनकार कर दिया, और उसने अपने प्रेमी के साथ रहने का फैसला किया।

Web Title : Married woman caught romancing lover in garden, villagers force marriage.

Web Summary : A married woman in Bihar, involved in an Instagram affair, was caught with her lover. Villagers forced them to marry in a temple. The husband refused to accept her, and she chose to stay with her lover.