Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 09:16 IST2026-04-30T09:09:12+5:302026-04-30T09:16:55+5:30

महाराष्ट्रासह देश - विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Maharashtra Marathi News Live Updates 30 April 2026: Vidhan Parishad Election, West Bengal Election, PM Narendra Modi, Mamata Banerjee, Tamilnadu, Keral Election, CM Devendra Fadnavis, IPL 2026, US Iran Ceasefire, Strait of Hormuz, Uddhav Thackeray | Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...

Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...

महाराष्ट्रासह देश - विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

LIVE

Get Latest Updates

30 Apr, 26 : 10:49 AM

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून विधान परिषदेवर उमेदवारी न मिळाल्याने अमोल मिटकरी नाराज

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून विधान परिषदेवर उमेदवारी न मिळाल्याने अमोल मिटकरी नाराज झाले आहेत

30 Apr, 26 : 10:34 AM

धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं मृत

पश्चिम बंगाल विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी बुधवारी मतदान पार पडलं. मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला, मात्र काही ठिकाणी हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटना समोर आल्या. याच दरम्यान एका वृद्धाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या एका घटनेत तृणमूल काँग्रेसच्या (TMC) कार्यकर्त्याचं डोकं फोडलं आणि त्याचे दात पाडण्यात आले. तिसरी घटना तर अत्यंत धक्कादायक आहे, जिथे मतदान करायला गेलेल्या एका महिलेला ती कागदोपत्री 'मृत' असल्याचं सांगण्यात आले. वाचा सविस्तर 

30 Apr, 26 : 10:01 AM

उमेदवारी जाहीर करण्यावाचून काँग्रेसला गत्यंतर नाही, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान

उमेदवारी जाहीर करण्यावाचून काँग्रेसला गत्यंतर नाही, काँग्रेस विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार देणार असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे. 

30 Apr, 26 : 09:42 AM

संजय राऊत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, तातडीने लक्ष घालण्याची केली मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊतांनी एक पत्र लिहिले आहे. या पत्राची प्रत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.  मुख्यमंत्र्यांनी यात तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यात करण्यात आली आहे. तसेच या ट्विटमध्ये अमित शाह यांनाही टॅग करण्यात आले आहे.

30 Apr, 26 : 09:37 AM

ठाकरेंच्या खेळीने विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; दोन्ही NCP साधणार डाव?

विधान परिषद निवडणुकीत अंबादास दानवे यांना उमेदवारी देऊन उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मित्र पक्षांसह सर्वांनाच धक्का दिला. त्यामुळे निवडणुकीला कलाटणी मिळाली असून काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. मविआतील फुटीचा फायदा घेत आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्याच्या हालचाली राष्ट्रवादीने (अजित पवार गट) सुरू केल्या आहेत.

30 Apr, 26 : 09:32 AM

शिंदेसेनेकडून बच्चू कडू यांचे विधान परिषदेसाठी नाव जवळपास निश्चित

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेवर पाठवले जाऊ शकते. यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. विधान परिषदेसाठी अर्ज भरण्याआधी शिंदे आणि कडू यांच्यात एक बैठक होणार आहे. या बैठकीनंतर नाव निश्चित केले जाणार आहे.

30 Apr, 26 : 09:30 AM

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विधान परिषदेसाठी झिशान सिद्दीकींना उमेदवारी

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून विधान परिषदेसाठी झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, पण मिळालेल्या माहितीनुसार झिशान सिद्दीकींचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.

Web Title: Maharashtra Marathi News Live Updates 30 April 2026: Vidhan Parishad Election, West Bengal Election, PM Narendra Modi, Mamata Banerjee, Tamilnadu, Keral Election, CM Devendra Fadnavis, IPL 2026, US Iran Ceasefire, Strait of Hormuz, Uddhav Thackeray