विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 09:56 IST2026-04-30T09:54:01+5:302026-04-30T09:56:08+5:30

Maharashtra Legislative Council Election: विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

NCP Nominates Zeeshan Siddique for Legislative Council Elections; Official Announcement on Last Day of Filing Nominations | विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!

विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!

Maharashtra MLC Election 2026: महाराष्ट्र राजकारण, विधान परिषद मतदान,विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) आपली रणनीती स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना विधान परिषदेची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली . थोड्याच वेळात झिशान सिद्दिकी उमेदवारी अर्ज दाखल करतील.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुतोवाच केले होते की, विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी पक्षांतर्गत झालेल्या चर्चेत झिशान सिद्दिकी यांचे नाव आघाडीवर आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असताना, पक्षाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या १२ मे २०२६ रोजी या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, १२ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात होऊन सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल.  विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील राजकीय गणितांची मोठी कसोटी लागणार आहे.

Web Title : विधान परिषद चुनाव: एनसीपी ने जीशान सिद्दीकी को नामांकित किया।

Web Summary : एनसीपी (अजित पवार) ने विधान परिषद चुनाव के लिए जीशान सिद्दीकी को नामांकित किया। नामांकन की समय सीमा से पहले अंतिम निर्णय, सिद्दीकी के पक्ष में पहले की चर्चाओं के बाद आया। दस सीटों के लिए मतदान 12 मई, 2026 को निर्धारित है। यह चुनाव राजनीतिक समीकरणों की परीक्षा लेगा।

Web Title : Zeeshan Siddiqui Nominated by NCP for Legislative Council Election.

Web Summary : NCP (Ajit Pawar) nominated Zeeshan Siddiqui for the Legislative Council election. The decision, finalized before the nomination deadline, follows earlier discussions favoring Siddiqui. Voting for ten seats is scheduled for May 12, 2026. This election will test political equations.