हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 13:34 IST2026-04-29T13:33:36+5:302026-04-29T13:34:45+5:30

Jaish-e-Mohammed Female Wing: पाकिस्तानात जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तय्यबाकडून महिला आत्मघातकी पथकांची भरती सुरू. मसूद अजहरच्या बहिणीचे नेतृत्व आणि जम्मू-काश्मीरवर हल्ल्याचा कट.

Hafiz Saeed recruits college girls for terrorism, holds camp in college on 18th... | हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...

हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद' आणि 'लश्कर-ए-तय्यबा' यांनी भारताच्या सुरक्षेला आव्हान देण्यासाठी एक भयानक कट रचला आहे. पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर 'महिला आत्मघातकी पथकाची' भरती केली जात आहे. या संपूर्ण मोहिमेची धुरा जैश-ए-मोहम्मदची महिला शाखा 'जमात-उल-मोमिनात' कडे सोपवण्यात आली आहे.

अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, १८ एप्रिल रोजी मुझफ्फराबादमधील गोजर येथील एका महाविद्यालयात १० तासांचे विशेष प्रशिक्षण सत्र पार पडले. या सत्रात दहशतवादी मसूद अजहरची बहीण सादिया अजहर आणि पीओकेमधील चार प्रमुख कमांडर उपस्थित होते. या गुप्त बैठकीत १५० हून अधिक महिलांना बोलविण्यात आले होते, ज्यांना आत्मघाती हल्ल्यांसाठी प्रशिक्षित केले जाणार आहे.

पाकिस्तानी लष्कराचे छुपे पाठबळ
निवृत्त ब्रिगेडियर हरदीप सिंह विरदी यांच्या मते, पाकिस्तानचे लष्कर आता महिला आत्मघातकी पथके तयार करण्यावर भर देत आहे. 'हरकत-उल-मुजाहिदीन'शी संबंधित महिलांनाही जम्मू-काश्मीरसह भारताच्या इतर भागांत दहशत माजवण्याचे 'टास्क' देण्यात आले आहे. या महिलांना लाहोरमध्ये विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून, स्वतः मसूद अजहर या प्रक्रियेत सहभागी होणार असल्याचे समजते.

जम्मू-काश्मीरच्या जिल्ह्यांची 'डेमोग्राफी' रडारवर
गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, या प्रशिक्षणादरम्यान महिलांना जम्मू-काश्मीरचा नकाशा दाखवून तेथील प्रत्येक जिल्ह्याची आणि लोकसंख्येची सविस्तर माहिती देण्यात आली. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात या महिलांना लाहोरमध्ये अंतिम लष्करी प्रशिक्षण दिले जाणार आहे. यापूर्वी लाहोर आणि बहावलपूरमध्येही अशा प्रकारचे कॅम्प लावण्यात आले होते.

Web Title : हाफिज सईद द्वारा कॉलेज लड़कियों की आतंकवाद के लिए भर्ती; शिविर आयोजित।

Web Summary : पाकिस्तान समर्थित समूह भारत में हमलों के लिए महिला आत्मघाती दस्ते की भर्ती कर रहे हैं, उन्हें प्रशिक्षण दे रहे हैं। आईएसआई के समर्थन से पाकिस्तान में शिविर आयोजित किए जा रहे हैं। जम्मू-कश्मीर के जनसांख्यिकीय आंकड़े एकत्र किए जा रहे हैं।

Web Title : Hafiz Saeed recruits college girls for terror; camp held.

Web Summary : Pakistan-backed groups recruit women for suicide squads, training them for attacks in India. Camps are being held in Pakistan, with ISI support. Jammu-Kashmir demographic data being collected.