Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 13:46 IST2026-04-29T13:45:39+5:302026-04-29T13:46:40+5:30

कडाक्याचं ऊन आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची टंचाई या पार्श्वभूमीवर नवरदेवाने सप्तपदी घेण्यापूर्वी नवरीसमोर अशी अट ठेवली की, जी ऐकून सर्वच जण हैराण झाले.

barabanki wedding groom laid down unique condition before bride ask if gas runs out you cook on traditional stove | Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट

Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट

उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये सध्या एका लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. कडाक्याचं ऊन आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची टंचाई या पार्श्वभूमीवर नवरदेवाने सप्तपदी घेण्यापूर्वी नवरीसमोर अशी अट ठेवली की, जी ऐकून सर्वच जण हैराण झाले. मात्र नवरीनेही अत्यंत समजूतदारपणा दाखवत ही अट मान्य केली, त्यानंतर लग्नाचे विधी थाटामाटात पार पडले.

बाराबंकी जिल्ह्यातील लोणी कटरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खैरा बीरू गावात ही घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या अशोकचं लग्न लक्ष्मीशी ठरलं होतं. लग्नाच्या तयारीदरम्यान अशोकला घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी कित्येक दिवस एजन्सीच्या फेऱ्या माराव्या लागल्या. लांबच लांब रांगा आणि सिलिंडरची टंचाई यामुळे नवरदेव इतका त्रस्त झाला की, त्याने लग्नापूर्वीच आपल्या होणाऱ्या पत्नीसमोर एक खास अट ठेवली.

अशोकने लक्ष्मीला विचारलं की, "जर भविष्यात सिलिंडरची अशीच अडचण निर्माण झाली, तर तू चुलीवर स्वयंपाक करायला तयार आहेस का?" हा प्रश्न ऐकून लग्नाला आलेले पाहुणे काही क्षणांसाठी चकित झाले. पण लक्ष्मीने कोणताही संकोच न करता ही अट मान्य केली. इतकंच नाही तर ती म्हणाली की, "वेळ पडली तर मी चुलीवर स्वयंपाक करण्यासोबतच शेतात काम करायलाही तयार आहे." नवरीच्या या उत्तराने नवरदेवाचं समाधान झालं आणि सर्वांनीच टाळ्या वाजवल्या.

नवरदेव अशोकने सांगितलं की, “भविष्यात जर गॅसची टंचाई निर्माण झाली, तर ती चुलीवर स्वयंपाक करेल का? ही माझी अट होती.” नवरीने ही अट मान्य केल्यानंतर रितीरिवाजाप्रमाणे सर्व विधी पार पडले. गावकऱ्यांच्या मते, हे लग्न केवळ एक अनोखी घटना नसून, नात्यातील समजूतदारपणा, सहकार्य आणि परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेण्याचा एक मोठा मेसेज देतं. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 

Web Title : दूल्हे की शर्त: सिलेंडर खत्म तो चूल्हे पर खाना बनाओगी?

Web Summary : उत्तर प्रदेश में गैस की कमी के बीच, एक दूल्हे ने दुल्हन से पूछा कि क्या वह चूल्हे पर खाना बनाएगी। दुल्हन ने सहमति जताई, जो समझदारी और अनुकूलन क्षमता का प्रदर्शन करती है। शादी सुचारू रूप से आगे बढ़ी, जो उनके सहयोगी भावना को उजागर करती है।

Web Title : Groom's Condition: Cook on Stove If Cylinder Runs Out!

Web Summary : Amidst gas shortages, an Uttar Pradesh groom asked his bride if she'd cook on a stove. She agreed, showcasing understanding and adaptability. The wedding proceeded smoothly, highlighting their cooperative spirit and sending a positive message to the community.