Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 11:22 IST2026-04-29T10:05:49+5:302026-04-29T11:22:46+5:30
महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...
LIVE
29 Apr, 26 : 11:55 AM
"TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतदारसंघातील भाजपा उमेदवार सुवेंदु अधिकारी यांनी दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान एक गंभीर आरोप केला आहे. तृणमूल काँग्रेसने (TMC) बोगस मतदान करण्यासाठी ७५० खोटी बोटं खरेदी केल्याचा दावा त्यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये एका बोटाचा फोटो दाखवत हा त्याचा नमुना असल्याचं सांगितलं. मात्र सत्ताधारी पक्षाने भवानीपूर मतदारसंघाबाबत केलेले हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. वाचा सविस्तर
29 Apr, 26 : 11:42 AM
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक: दुसऱ्या टप्प्यात सकाळी ११ वाजेपर्यंत ४० टक्के मतदान
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सकाळी ११ वाजेपर्यंत ४० टक्के मतदान झाले आहे
29 Apr, 26 : 11:22 AM
उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या गौर ग्रीन ॲव्हेन्यू सोसायटीत बुधवारी सकाळी भीषण आग लागली. १३ मजली इमारतीच्या नवव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये सर्वप्रथम आग लागली. आग वेगाने आजूबाजूच्या अनेक फ्लॅट्समध्ये पसरली. यात ९व्या ते १२व्या मजल्यांवरील आठ फ्लॅट्स पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रय़त्न सुरु आहेत.
29 Apr, 26 : 10:58 AM
EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ साठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सध्या सुरू आहे. पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यातही मतदार मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर हजेरी लावत आहेत. मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. बाली विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर मशीन खराब झाल्यामुळे मतदार संतप्त झाले. येथील परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, सुरक्षादलाला लाठीचार्ज करावा लागला. वाचा सविस्तर
29 Apr, 26 : 10:51 AM
दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा मस्साजोग पोटनिवडणुकीत पराभव
बीडच्या मस्साजोग पोटनिवडणुकी धक्कादायक निकाल लागला आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला आहे. स्वरुपानंद देशमुख यांनी अश्विनी यांचा ९२ मतांनी पराभव केला.
29 Apr, 26 : 10:50 AM
कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्याचा धोका वाढला; पालिकेचे नागरिकांना आवाहन
सध्या उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका च्या आरोग्य विभागाकडून नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
29 Apr, 26 : 10:37 AM
उदय सामंत-मनोज जरांगे भेट; कुणबी प्रमाणपत्रावर चर्चा
मंत्री उदय सामंत यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. हैदराबाद गॅझेटिअरनुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जात नसल्यामुळे जरांगे नाराज असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जून महिन्यात पुन्हा उपोषण करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती.
29 Apr, 26 : 10:29 AM
पंतप्रधान मोदी काश्वी विश्वनाथ मंदिरात, त्रिशूळ-डमरू उंचावले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी काशी येथील बाबा विश्वनाथ मंदिराला भेट दिली. त्यांनी गर्भगृहात २० मिनिटे प्रार्थना केली. पाच पुजाऱ्यांसह त्यांनी पूजा केली. नंतर त्यांना पुष्पहार घालण्यात आला आहे आणि त्रिपुंड लावले. पंतप्रधान मंदिरातून बाहेर येताच, भाजप नेत्यांनी त्यांना त्रिशूळ आणि डमरू भेट दिले. त्यानंतर पंतप्रधानांनी त्रिशूळ उंचावून तो फिरवला.
#WATCH | Varanasi | PM Narendra Modi holds a 'Trishul-Damru' after offering prayers at Shri Kashi Vishwanath temple pic.twitter.com/WZtRjWpJzl
— ANI (@ANI) April 29, 2026
29 Apr, 26 : 10:21 AM
बंगालमध्ये आतापर्यंत १८% मतदान; ममता बॅनर्जींचा अनियमिततेचा आरोप, नादियामध्ये भाजप कार्यकर्त्यावर हल्ला
बंगालमध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत १८% टक्के मतदान झाले. दरम्यान, ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांनी बंगाल निवडणुकीत भाजपवर केंद्रीय दलांचा प्रमाणाबाहेर वापर केल्याचा आरोप केला आहे.
29 Apr, 26 : 10:18 AM
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाची ५ जणांची यादी जाहीर
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी आता भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने ५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महत्वाचे म्हणजे, भाजपने यावेळीही धक्कातंत्राचा वापर केला आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. या यादीत, सुनील विनायक कर्जतकर (Sunil Vinayak Karjatkar), माधवी नाईक (Madhavi Naik), संजय नत्थूजी भेंडे (Sanjay Natthuji Bhende), विवेक बिपिनदादा कोल्हे (Vivek Bipindada Kolhe) आणि प्रमोद शांताराम जठार (Pramod Shantaram Jathar) यांचा समावेश आहे.
29 Apr, 26 : 10:15 AM
माजी आमदार बच्चू कडू १२ वाजता पत्रकार परिषद घेणार; भूमिका स्पष्ट करणार
माजी आमदार बच्चू कडू आज दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. विधान परिषदेसाठी शिंदे गटाकडून त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. बच्चू कडू यांचा पक्ष शिंदेंच्या शिवसेनेत विलिन होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर ते आज भूमिका मांडणार आहेत.