मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 11:30 IST2026-04-29T10:55:21+5:302026-04-29T11:30:50+5:30
Beed Massajog Sarpanch By Election Result 2026: सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे रिक्त झालेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे.

मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
Swarupanand Deshmukh Massajog New Sarpanch: सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे रिक्त झालेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. सरपंचपदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीत स्वरुपानंद देशमुख (Swarupanand Deshmukh) यांनी अश्विनी देशमुख यांना ९२ मतांनी पराभूत केले आहे.
संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मस्साजोग गावच्या सरपंचपदाची निवडणूक ही बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तसेच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अश्विनी देशमुख यांच्याविरोधात स्वरूपानंद देशमुख हे रिंगणात उतरल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले होते.
स्वरूपानंद यांचा गेल्या निवडणुकीत पराभव
दरम्यान, मागील निवडणुकीत अवघ्या ९ मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यावेळी मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. आज झालेल्या मतमोजणीत पहिल्याच फेरीत आघाडी घेत स्वरूपानंद देशमुख यांनी सर्वांना धक्का दिला होता. त्यानंतर दुसऱ्या फेरीत अश्विनी देशमुख यांनी आघाडी मिळवली होती. मात्र निर्णायक ठरलेल्या तिसऱ्या फेरीत मोठी आघाडी घेत स्वरूपानंद देशमुख यांनी विजय निश्चित केला. अखेरीस स्वरूपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांचा अटीतटीच्या लढतीत ९२ मतांनी पराभव करत मस्साजोगचं सरपंचपद पटकावलं.