बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 12:20 IST2026-04-29T12:19:22+5:302026-04-29T12:20:13+5:30

Bank of Baroda PO Salary Slip Viral: बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला (BoB PO) किती पगार मिळतो? सोशल मीडियावर व्हायरल झालेली सॅलरी स्लिप आणि मिळणाऱ्या भत्त्यांची सविस्तर माहिती वाचा.

How much salary does a Bank of Baroda probationary officer get? Salary slip goes viral on social media; You will be shocked to see the list of allowances! | बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!

बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!

मुंबई: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी प्रेरणा देणारी बातमी समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर बँक ऑफ बडोदा मधील एका प्रोबेशनरी ऑफिसरची पहिली सॅलरी स्लिप प्रचंड व्हायरल होत असून, त्यातील आकडा पाहून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत.

४० दिवसांचा पगार ९८ हजारांच्या पार!
पंकज कुमार दास या तरुण बँक अधिकाऱ्याने इन्स्टाग्रामवर आपली पहिली सॅलरी स्लिप शेअर केली आहे. ही स्लिप मे २०२५ मधील असून, यात ४० दिवसांचा एकूण पगार ९८,७४५ रुपये दिसत आहे. हा पगार पाहून नेटकऱ्यांमध्ये बँकेच्या नोकरीबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या रकमेमध्ये बेसिक पे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर विशेष भत्त्यांचा समावेश आहे.

पगाराशिवाय मिळतात या 'शाही' सुविधा
बँक ऑफ बडोदामध्ये पीओ पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याला केवळ पगारच नाही, तर इतर अनेक सुविधाही मिळतात. पंकजने दिलेल्या माहितीनुसार, बँक पीओला खालील भत्ते मिळतात, यामध्ये भाड्याने घर घेण्यासाठी मोठी रक्कम, पेट्रोल खर्च, वर्तमानपत्र भत्ता, मनोरंजन भत्ता, मेडिकल सुविधा, डोळ्यांची तपासणी, मोबाइल आणि रिचार्ज खर्च.

इतर फायदे: घराची देखभाल, रिफ्रेशमेंट अलाउन्स आणि बँकेच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची सुविधा.

अशी मिळते ही नोकरी
पंकजने ही नोकरी IBPS द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेच्या माध्यमातून मिळवली आहे. कठोर परिश्रम आणि विविध टप्प्यांतील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच बँक ऑफ बडोदामध्ये 'पीओ' म्हणून नियुक्ती मिळते. पंकजने यापूर्वी RRB CSA परीक्षा देखील उत्तीर्ण केली आहे.


Web Title : बैंक ऑफ बड़ौदा पीओ का वेतन वायरल; भत्ते देखकर दर्शक दंग!

Web Summary : बैंक ऑफ बड़ौदा के प्रोबेशनरी ऑफिसर की सैलरी स्लिप वायरल, 40 दिनों के लिए ₹98,745 का वेतन। मूल वेतन के अलावा, आवास, पेट्रोल, समाचार पत्र, चिकित्सा और मोबाइल भत्ते शामिल हैं। पंकज कुमार दास ने आईबीपीएस परीक्षा के माध्यम से नौकरी हासिल की, जिससे बैंकिंग उम्मीदवारों को प्रेरणा मिली।

Web Title : Bank of Baroda PO Salary Goes Viral; Benefits Stun Viewers!

Web Summary : Bank of Baroda probationary officer's salary slip goes viral, revealing a ₹98,745 pay for 40 days. Besides basic pay, perks include housing, petrol, newspaper, medical, and mobile allowances. Pankaj Kumar Das secured the job through IBPS exam, inspiring banking aspirants.