भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 13:16 IST2026-04-29T13:14:06+5:302026-04-29T13:16:12+5:30

India Crude Oil Import : होर्मुजची सामुद्रधुनी बंद झाल्याने भारताच्या तेल पुरवठ्यावर काय परिणाम झाला? सौदी अरब आणि UAE ने भारताला तेल पोहोचवण्यासाठी कोणता नवा मार्ग शोधला?

India halved oil purchases from America! india crude oil import strait of hormuz bypass saudi uae russia | भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  

भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  

इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. या युद्धामुळे सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला 'होर्मुजचा मार्ग' बंद झाल्याने भारतासमोर तेल आणि वायू टंचाईचे मोठे संकट उभे राहिले होते. मात्र, भारताचे जुने मित्र असलेल्या सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिराती यांनी या संकटावर मात करण्यासाठी नवा मार्ग शोधला आहे, ज्यामुळे भारताचा तेल पुरवठा आता पूर्वपदावर येत आहे.

होर्मुजची सामुद्रधुनी हा आखाती देशांतून तेल बाहेर काढण्याचा मुख्य मार्ग आहे. हा मार्ग बंद झाल्यावर सौदी अरबने आपल्या 'ईस्ट-वेस्ट पाइपलाइन'चा वापर सुरू केला आहे. याद्वारे तेल लाल समुद्रातील 'यनबू टर्मिनल'पर्यंत पोहोचवले जात आहे. दुसरीकडे, UAE ने 'ADCOP पाइपलाइन'द्वारे आपले तेल ओमानच्या आखातातील 'फुजैरा' बंदरात नेले आहे. या दोन्ही पर्यायी मार्गांमुळे भारताला होर्मुजच्या मार्गाशिवाय तेल मिळणे शक्य झाले आहे.

पुरवठ्याची आकडेवारी काय सांगते?

सौदी अरब: एप्रिलमध्ये सौदीकडून दररोज ६.९७ लाख बॅरल तेल मिळाले, जे गेल्या वर्षीच्या सरासरीपेक्षा जास्त आहे.

UAE: युएईकडून होणारा पुरवठा ६.१९ लाख बॅरल प्रतिदिवस झाला आहे, जो मागील ४.३३ लाखांच्या तुलनेत वाढला आहे.

ओमान: ओमानचे तेल होर्मुजमधून येत नसल्याने भारताने तिथूनही खरेदी वाढवली असून ती १.०१ लाख बॅरलवर पोहोचली आहे.

रशिया, इराण आणि वेनेझुएलाची साथ:
होर्मुज संकटामुळे इराक, कुवेत आणि कतारकडून होणारा पुरवठा १५ टक्क्यांनी घटला असला तरी, भारताने इतर पर्याय खुले केले आहेत. सात वर्षांनंतर इराणकडून आणि नऊ महिन्यांनंतर वेनेझुएलाकडून पुन्हा तेल आयात सुरू झाली आहे. अमेरिकेने रशियन तेलावरील निर्बंधांमध्ये दिलेली ढील भारतासाठी दिलासादायक ठरली असून, रशियाकडून दररोज १६ लाख बॅरल तेल भारताला मिळत आहे.

अमेरिकेकडून पुरवठ्यातील घसरणीची आकडेवारी:

एप्रिलमधील पुरवठा: १.१५ लाख बॅरल प्रतिदिवस.

२०२५-२६ ची सरासरी: ३.१४ लाख बॅरल प्रतिदिवस.

Web Title : भारत ने अमेरिकी तेल आयात घटाया; नए आपूर्ति मार्ग खुले।

Web Summary : वैश्विक तनाव के बीच, भारत ने अमेरिकी तेल पर निर्भरता कम की। सऊदी अरब और यूएई ने वैकल्पिक मार्ग खोजे, जिससे ओमान, रूस, ईरान और वेनेजुएला से आपूर्ति सुनिश्चित हुई।

Web Title : India Cuts US Oil Imports; New Supply Routes Emerge.

Web Summary : Amidst global tensions, India reduces US oil reliance. Saudi Arabia and UAE find alternative routes, ensuring steady supply from Oman, Russia, Iran and Venezuela.