Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'

सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'

Biryani and Watermelon Myth: एकाच कुटुंबातील चार जणांनी बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्लं होतं. यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न हा उपस्थित होत आहे की, बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाणं खरोखरच जीवघेणं ठरू शकतं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 12:24 IST2026-04-29T12:21:06+5:302026-04-29T12:24:46+5:30

Biryani and Watermelon Myth: एकाच कुटुंबातील चार जणांनी बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्लं होतं. यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न हा उपस्थित होत आहे की, बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाणं खरोखरच जीवघेणं ठरू शकतं का?

is eating watermelon after biryani dangerous or myth with doctor explanation on food poisoning | सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'

सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'

मुंबईतून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. एकाच कुटुंबातील चार जणांनी बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्लं होतं. यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न हा उपस्थित होत आहे की, बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाणं खरोखरच जीवघेणं ठरू शकतं का? अनेक डॉक्टरांनी यावर आपलं मत मांडलं आहे.

मेडिकल एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, बिर्याणी आणि कलिंगड यांसारखे पदार्थ एकत्र किंवा थोड्या अंतराने खाल्ल्याने थेट मृत्यू होणं शक्य नाही. डॉ. ईश्वर गिलाडा यांच्या मते, हे दोन्ही वेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ असून त्यांच्या पचनाचा वेळ वेगवेगळा असू शकतो. मात्र यामुळे लगेच जीवघेणी परिस्थिती निर्माण होणं सामान्य नाही. अशा प्रकरणांमध्ये सर्वात आधी 'फूड पॉयझनिंग'चा संशय येतो. जर अन्न किंवा फळं बराच वेळ उघड्यावर ठेवलं असेल किंवा शिळं झालं असेल तर त्यामध्ये घातक बॅक्टेरिया निर्माण होऊ शकतात. स्टॅफिलोकोकस, साल्मोनेला आणि ई. कोलाय सारखे बॅक्टेरिया अन्नाद्वारे शरीरात पोहोचून उलट्या, जुलाब आणि गंभीर संसर्ग पसरवू शकतात. काही प्रकरणांमध्ये ही स्थिती 'सेप्सिस'पर्यंत पोहोचू शकते, जी जीवघेणी ठरू शकते.

फूड पॉयझनिंगमुळे लगेच मृत्यू होतो का?

डॉक्टर सांगतात की, फूड पॉयझनिंगनंतर शरीरात लक्षणं दिसण्यास आणि स्थिती गंभीर होण्यास साधारणपणे थोडा वेळ लागतो. जर व्यक्ती आधीपासून निरोगी असेल, तर शरीर या संसर्गाशी लढण्याचा प्रयत्न करते. मात्र, सतत उलट्या आणि जुलाब झाल्यामुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाईट्स कमी होतात, ज्यामुळे ब्लड प्रेशर अचानक कमी होऊ शकतो आणि व्यक्ती 'शॉक'मध्ये जाऊ शकते. हीच स्थिती काही प्रकरणांमध्ये धोकादायक ठरू शकते.

फूड कॉम्बिनेशनबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात?

काही तज्ज्ञांचं असं मानणं आहे की, नॉनव्हेज आणि पाणी भरपूर असलेल्या फळांच्या पचनाचा वेळ वेगवेगळा असतो. कलिंगड लवकर पचतं, तर नॉनव्हेज पचायला जास्त वेळ लागतो. अशा परिस्थितीत दोन्ही एकत्र खाल्ल्यास पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात, पण ते थेट मृत्यूचं कारण मानता येणार नाही.

सडलेलं अन्न बॅक्टेरियल इन्फेक्शनचं कारण

इंफेक्शन स्पेशलिस्ट डॉ. ईश्वर गिलाडा यांच्या मते, अशा घटनेतील नेमकं कारण शोधणं सोपं नसतं. ते म्हणाले की, जर तेच अन्न अनेक लोकांनी खाल्लं असेल आणि सर्वच प्रभावित झाले नसतील, तर मृतांनी वेगळं काय खाल्लं होतं किंवा इतर काही कारण होतं का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सडलेलं अन्न बॅक्टेरियल इन्फेक्शनचं कारण बनू शकतं, परंतु काही प्रकरणांमध्ये रासायनिक केमिकल किंवा टॉक्सिनच्या शक्यतेकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.

डॉक्टरांनी स्पष्ट केलं की, मृत्यूचं नेमकं कारण पोस्टमार्टम आणि फॉरेन्सिक तपासणीनंतरच समोर येईल. अनेकदा कलिंगड लाल दिसण्यासाठी त्यात केमिकलचे इंजेक्शन दिले जातात. जर ते केमिकल दूषित असेल किंवा त्यात कोणी विषारी घटक मिसळले असतील, तर त्यामुळे विषबाधा होऊ शकते. मात्र या चौघांचा मृत्यू नेमका कसा झाला, हे पोस्टमार्टम अहवालानंतरच स्पष्ट होईल.

Web Title : क्या बिरयानी के बाद तरबूज खाने से वाकई में मौत हो जाती है?

Web Summary : विशेषज्ञों ने बिरयानी के बाद तरबूज खाने से होने वाली मौत के दावे का खंडन किया है। बासी भोजन, जीवाणु संक्रमण या रासायनिक संदूषण से खाद्य विषाक्तता अधिक संभावित कारण हैं। पोस्टमार्टम रिपोर्ट से असली कारण पता चलेगा।

Web Title : Biryani and Watermelon: Can this combination really cause death?

Web Summary : Experts debunk the claim that biryani followed by watermelon causes death. Food poisoning from stale food, bacterial infections, or chemical contamination are more likely culprits. Post-mortem reports will reveal the true cause.