जवळचे-मित्रमैत्रिणीच आपल्यावर जळतात हे कसं ओळखाल? ८ खुणा-सावध राहा, होऊ शकतो त्रास
Updated:April 29, 2026 18:03 IST2026-04-28T19:17:05+5:302026-04-29T18:03:14+5:30
How Do You Know If People Are Jealous Of You : तुमच्यावर जळणारे लोक तुम्हाला कधीही प्रगतीचा मार्ग दाखवत नाहीत.

आपल्या प्रगतीवर किंवा सुखावर जळणारे लोक अनेकदा समोरून खूप चांगले वागतात पण त्यांच्या वागण्यातील काही सूक्ष्म बदल त्यांना ओळखायला मदत करतात. अशा लोकांना ओळखण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्या. (8 Warning Signs That Someone Is Secretly Jealous Of You)
खोटी स्तूती करणं
जळणारे लोक तुमच्या तोंडावर खूप गोड बोलतात आणि अतिशयोक्तीपूर्ण कौतुक करतात पण तुम्ही तिथून गेल्यावर लगेच तुमच्याबद्दल नकारात्मक बोलू लागतात. (How Do You Know If People Are Jealous Of You)
तुमच्या यशाला नशीब म्हणणं
तुम्ही घेतलेल्या कष्टांचे कौतुक करण्याऐवजी तुझं नशीब चांगलं होतं म्हणून झालं किंवा कोणाचीतरी मदत मिळाली असेल असं म्हणून तुमच्या मेहनतीला कमी लेखतात.
नक्कल करण्याचा प्रयत्न
मनातून तुमचा हेवा करतात. त्यामुळे ते बोलण्याची पद्धत, कपडे किंवा काम करण्याची शैली चोरून तुमची बरोबर करण्याचा प्रयत्न करतात.
चुकांवर बारीक लक्ष ठेवणं
चांगल्या कामांबद्दल हे लोक गप्प राहतील पण तुमच्याकडून एखादी छोटी चूक झाली की सर्वांसमोर सांगायला किंवा त्याचे भांडवल करायला त्यांना आनंद होतो.
तुमच्या आनंदात शांत राहणं
जेव्हा तुम्ही एखादी आनंदाची बातमी सांगता तेव्हा त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडतो.
सतत तुलना करणं
ते नेहमी स्वत:ची किंवा इतरांची तुलना करतात. तुम्ही काही विकत घेतलं किंवा काही साध्य केलं की लगेच माझ्याकडे यापेक्षा जास्त चांगलं आहे किंवा त्याचं यापेक्षा उत्तम आहे. असं म्हणत तुमच्या आनंदावर विरजण घालतात.
चुकीचा सल्ला देणं
तुमच्यावर जळणारे लोक तुम्हाला कधीही प्रगतीचा मार्ग दाखवत नाहीत. अनेकदा ते तुम्हाला जाणीवपूर्ण असा सल्ला देतात ज्यामुळे तुमचं नुकसान होईल.