प्रेग्नंसी टेस्ट घरी करताना तुम्हाला काय माहिती हवी? टेस्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, किट अशी वाचा..
Updated:April 28, 2026 13:42 IST2026-04-28T11:56:25+5:302026-04-28T13:42:38+5:30
How To Read Pregnancy Test Kit At Home (Pregnancy Test Strip Results Pictures) : जर सी वर रेषा न येता फक्त टी वर येत असेल तर ते कीट खराब आहे असं समजा.

प्रेग्नंसी किट वापरल्यानंतर त्यावरील रिझल्ट विंडोमध्ये उमटणाऱ्या रेषांचा अर्थ समजून घेणं खूप महत्वाचे असते. काही मुद्द्यांच्या आधारे तुम्ही हे रिजल्ट्स वाचू शकता. (How To Read Pregnancy Test Kit At Home)
दोन खिडक्या किंवा खुणा
किटवर साधारणपणे कंट्रोल (Control) आणि टेस्ट (Test)अशा दोन खुणा असतात. (How To Read Pregnancy Test Positive)
C लाईनचा अर्थ
सी म्हणजे कंट्रोल लाईन. किट योग्यरित्या काम करत असेल तर ही लाईन नेहमी उमटतेच.
T लाईनचा अर्थ
T म्हणजे टेस्ट लाईन. ही लाईन शरीरातील एचसीजी हॉर्मोनची उपस्थिती दर्शवते.
दोन गडद रेषा (Positive)
जर सी आणि टी या दोन्ही जागी गुलाबी किंवा लाल रेषा दिसल्या तर याचा अर्थ रिझल्ट पॉझिटिव्ह आहे.
एकच रेषा (Negative)
जर फक्त सी च्या जागी रेषा उमटली आणि टी ची जागा रिकामी राहिली तर रिझल्ट निगेटिव्ह आहे.
अस्पष्ट किंवा फिकट रेषा
जर टी च्या जागी खूप फिकट रेषा दिसत असेल तरीही तो पॉझिटिव्ह रिझल्ट मानला जातो अशावेळी २ दिवसांनी पुन्हा टेस्ट करावी.
केवळ टी वर रेषा दिसणं
जर सी वर रेषा न येता फक्त टी वर येत असेल तर ते कीट खराब आहे असं समजा. रिझल्ट पाहण्यासाठी किटवर दिलेल्या सुचनेनुसार ३ ते ५ मिनिटं वाट पाहा.खूप उशिरा १० मिनिटांनंतर पाहिलेला रिझल्ट चुकीचा असू शकतो.