लग्नाच्या गिफ्टसाठी शोधताय परफेक्ट दागिना? ३ ग्रॅम सोन्यात पाहा ८ अप्रतिम नेकलेस डिझाइन्स; बजेटमध्येही आणि दिसायलाही 'रॉयल'!
Updated:April 27, 2026 21:00 IST2026-04-27T21:00:00+5:302026-04-27T21:00:01+5:30
Budget friendly gold jewellery for marriage: Traditional lightweight gold necklace designs: सोन्याचे ८ अप्रतिम नेकलेस डिझाइन्स पाहूया.

भारतीय परंपरेत सोन्याचा दागिना भेट देणे हे केवळ प्रेमाचे प्रतीक नसून ती एक सुरक्षित गुंतवणूकही मानली जाते. मात्र, सोन्याचे सतत वाढणारे दर पाहता, 'बजेटमध्ये' बसणारा आणि तरीही 'रॉयल' दिसणारा दागिना शोधणे हे मोठे आव्हान ठरते. अशा वेळी ३ ते ५ ग्रॅम वजनातील लाईट वेट गोल्ड नेकलेस हा एक अतिशय स्मार्ट आणि लोकप्रिय पर्याय. (Budget friendly gold jewellery for marriage)
आपणही एखाद्या खास लग्नासाठी किंवा समारंभासाठी बजेटमध्ये बसणारे पण तरीही श्रीमंत लूक देणारे गिफ्ट शोधत असाल, तर हे ८ अप्रतिम नेकलेस डिझाइन्स लेटेस्ट आहेत. पाहूयात त्याचे काही खास कलेक्शन. (Traditional lightweight gold necklace designs)
लेझर कटिंग दागिन्यामध्ये सोनं कमी लागतं फुलांच्या पाकळ्यांचे नाजूक नक्षीकाम असलेला हा चोकर गळ्याला घट्ट बसतो आणि साडीवरही अत्यंत सुंदर दिसतो.
पारंपारिक कोल्हापुरी साजामध्ये २१ पाने असतात, पण भेट देण्यासाठी तुम्ही ७ किंवा ११ पानांचा 'मिनी साज' निवडू शकता. जो आपल्याला अतिशय पारंपरिक आणि श्रीमंत लूक देतो.
पेन्डलंट स्टाईल मटार माळ याच्यामध्ये मध्यभागी एक नाजूक पान किंवा शंखाचे डिझाइन असलेला नेकलेस बजेटमध्ये बसणारा चांगला पर्याय आहे.
देव-देवतांच्या मुर्ती कोरलेले छोटे नेकलेस सध्या लग्नसराईत खूप चालतात. ५ ग्रॅममध्ये तुम्ही लक्ष्मीची प्रतिमा असलेला नाजूक 'कासू माळा' किंवा छोटे टेंपल पेन्डलंट असलेला हार घेऊ शकता.
फिलिग्री म्हणजे सोन्याच्या बारीक तारांपासून बनवलेले जाळीदार काम. यामुळे दागिना वजनाला अतिशय हलका असतो पण त्याचा आकार मोठा दिसतो. हा वेस्टर्न गाऊनवरही छान दिसतो.
ठुशी हा प्रकार वजनाला कमी आणि दिसायला भरगच्च असतो. ३ ग्रॅममध्ये सोन्याच्या मण्यांनी विणलेली आणि मध्यभागी एखादा लाल किंवा हिरवा खडा असलेली ठुशी परफेक्ट गिफ्ट आहे.
सोन्याच्या छोट्या गोल चकत्या किंवा 'टिकल्या' एकमेकांना जोडून टिकली माळ नेकलेस बनवला जातो. ३ ते ४ ग्रॅममध्ये याची लांबी चांगली मिळते आणि हा दागिना गळ्यात खूप उठून दिसतो.
नववधूला आधुनिक डिझाइन्स आवडत असतील, तर त्रिकोण किंवा चौकोनी आकारांचे छोटे छोटे सोन्याचे तुकडे जोडून बनवलेला नेकलेस निवडा. हा ऑफिस वेअर किंवा इंडो-वेस्टर्न कपड्यांवरही शोभून दिसतो.