गावाहून तांदळाचं पोतं आणलं पण अळी झाली तर? डब्यात हे पदार्थ ठेवा, अळ्याकिड्यांचा धोका कमी

Updated:April 27, 2026 16:03 IST2026-04-27T15:13:33+5:302026-04-27T16:03:20+5:30

How To Keep Rice Bugs Away : तांदूळ नेहमी कोरड्या आणि हवेशीर जागी ठेवा. तांदळात ओलावा राहिल्यास किडे लवकर होतात.

गावाहून तांदळाचं पोतं आणलं पण अळी झाली तर? डब्यात हे पदार्थ ठेवा, अळ्याकिड्यांचा धोका कमी

तांदळाला पोर किडे लागू नयेत यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय करून पाहायला हवेत. बरेच लोक उन्हाळ्याच्या दिवसांत वर्षभराचं धान्य भरून ठेवतात. अशावेळी धान्य चांगले राहण्यासाठी काही उपाय करायला हवेत. (How To Prevent Rice Bugs Naturally)

गावाहून तांदळाचं पोतं आणलं पण अळी झाली तर? डब्यात हे पदार्थ ठेवा, अळ्याकिड्यांचा धोका कमी

तांदळाच्या डब्यात कडुलिंबाचा सुकलेला पाला घातल्यास त्याचा उग्र वास पोर किडे तयार होऊ देत नाही. (How To Prevent Rice Bugs)

गावाहून तांदळाचं पोतं आणलं पण अळी झाली तर? डब्यात हे पदार्थ ठेवा, अळ्याकिड्यांचा धोका कमी

लवंगाचा वास अतिशय तीव्र असतो. त्यामुळे तांदळाच्या डब्यात थोड्या लवंगा घातल्यास किडे मरतात आणि नवीन किडे तयार होत नाहीत.

गावाहून तांदळाचं पोतं आणलं पण अळी झाली तर? डब्यात हे पदार्थ ठेवा, अळ्याकिड्यांचा धोका कमी

तांदळाला थोडं मोहोरीचं तेल चोळून ठेवल्यानं तांदूळ वर्षभर चांगले राहतात आणि त्यात किडे होत नाहीत.

गावाहून तांदळाचं पोतं आणलं पण अळी झाली तर? डब्यात हे पदार्थ ठेवा, अळ्याकिड्यांचा धोका कमी

तांदळाच्या डब्यात दालचिनीचे छोटे तुकडे ठेवल्यानं त्या वासामुळे किडे डब्यात शिरत नाहीत.

गावाहून तांदळाचं पोतं आणलं पण अळी झाली तर? डब्यात हे पदार्थ ठेवा, अळ्याकिड्यांचा धोका कमी

एका छोट्या कापडात कापूर बांधून तो डब्यात खालच्या बाजूला ठेवल्यास किड्यांचा प्रादूर्भाव टाळता येतो.

गावाहून तांदळाचं पोतं आणलं पण अळी झाली तर? डब्यात हे पदार्थ ठेवा, अळ्याकिड्यांचा धोका कमी

तांदळात १० ते १२ सुक्या लाल मिरच्या घालून ठेवल्यानं त्यातील तिखटपणामुळे किडे तांदळापासून लांब राहतात.

गावाहून तांदळाचं पोतं आणलं पण अळी झाली तर? डब्यात हे पदार्थ ठेवा, अळ्याकिड्यांचा धोका कमी

तांदूळ साठवण्यापूर्वी तांदळाचा डबा स्वच्छ धुवून वाळवून मगच त्यात तांदूळ भरावा.