जिममध्ये जाऊनही पोटावरची- मांड्यांवरची चरबी कमी होत नाही? १५ मिनिटे करा 'हा' स्मार्ट वर्कआउट, कॅलरी बर्न होतील वेगानं

Updated:April 27, 2026 19:12 IST2026-04-27T19:00:00+5:302026-04-27T19:12:02+5:30

Fastest way to lose weight at home: Full body workout for maximum calorie burn: पोटाचा घेरा आणि मांड्यांचा आकार कमी करण्यासाठी धडपडत असाल, तर हा स्मार्ट वर्कआउट आपल्यासाठी गेमचेंजर ठरेल. पाहूया कोणते वर्कआउट करायला हवे.

जिममध्ये जाऊनही पोटावरची- मांड्यांवरची चरबी कमी होत नाही? १५ मिनिटे करा 'हा' स्मार्ट वर्कआउट, कॅलरी बर्न होतील वेगानं

सध्याच्या धावपळीच्या युगात फिट राहण्यासाठी अनेकजण जिममध्ये तासन्तास घाम गाळतात. पण जिममध्ये जाऊनही पोटावरची आणि मांड्यांवरची चरबी काही केल्या कमी होत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे आपण करत असलेला चुकीचा व्यायाम. शरीराच्या विशिष्ट भागांतील चरबी, ज्याला आपण 'स्टबर्न फॅट' (Stuborn Fat) म्हणतो, ती केवळ ट्रेडमिलवर चालल्याने कमी होत नाही. यासाठी गरज असते ती म्हणजे शरीराचे मेटाबॉलिझम वाढवणाऱ्या 'स्मार्ट वर्कआउट'ची. (Fastest way to lose weight at home)

जिममध्ये जाऊनही पोटावरची- मांड्यांवरची चरबी कमी होत नाही? १५ मिनिटे करा 'हा' स्मार्ट वर्कआउट, कॅलरी बर्न होतील वेगानं

कमी वेळात जास्त रिझल्ट हवा असेल, तर १५ मिनिटांचा HIIT (High-Intensity Interval Training) हा फॉर्म्युला ठरू शकतो. पोटाचा घेरा आणि मांड्यांचा आकार कमी करण्यासाठी धडपडत असाल, तर हा स्मार्ट वर्कआउट आपल्यासाठी गेमचेंजर ठरेल. पाहूया कोणते वर्कआउट करायला हवे. (Full body workout for maximum calorie burn)

जिममध्ये जाऊनही पोटावरची- मांड्यांवरची चरबी कमी होत नाही? १५ मिनिटे करा 'हा' स्मार्ट वर्कआउट, कॅलरी बर्न होतील वेगानं

बर्पीज हा संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे. एका बर्पीशमध्ये पुश- अप्स, स्कॉट्स आणि जंप करता येतात. त्यामुळे मिनिटात १० ते १५ कॅलरीज जळतात. जे आपल्या पोटाच्या स्नायूंवर काम करतात.

जिममध्ये जाऊनही पोटावरची- मांड्यांवरची चरबी कमी होत नाही? १५ मिनिटे करा 'हा' स्मार्ट वर्कआउट, कॅलरी बर्न होतील वेगानं

माउंटन क्लाइंबर्स हा व्यायाम पोटावरची चरबी जाळण्यासाठी सर्वोत्तम आहे. प्लँक पोझिशनमध्ये येऊन सायकल चालवल्याप्रमाणे पाय वेगाने छातीकडे आणावेत. यामुळे मांड्यांचे स्नायूही टोन होतात.

जिममध्ये जाऊनही पोटावरची- मांड्यांवरची चरबी कमी होत नाही? १५ मिनिटे करा 'हा' स्मार्ट वर्कआउट, कॅलरी बर्न होतील वेगानं

मांड्या आणि हिप्सवरील चरबी कमी करण्यासाठी जंप स्कॉट्स मारताना उडी मारुन खाली बसावे. यामुळे खालच्या शरीरातील ताकद वाढते आणि कॅलरीज वेगाने जळण्यास मदत होते.

जिममध्ये जाऊनही पोटावरची- मांड्यांवरची चरबी कमी होत नाही? १५ मिनिटे करा 'हा' स्मार्ट वर्कआउट, कॅलरी बर्न होतील वेगानं

हाय नीज हा व्यायाम एकाच जागी उभे राहून आपले गुडघे छातीपर्यंत येतील अशा पद्धतीने वेगाने धावण्याचा सराव करा. हे कार्डिओचे चांगले स्वरुप आहे.

जिममध्ये जाऊनही पोटावरची- मांड्यांवरची चरबी कमी होत नाही? १५ मिनिटे करा 'हा' स्मार्ट वर्कआउट, कॅलरी बर्न होतील वेगानं

प्रत्येक व्यायाम हा ३० सेकंद करायला हवा. त्यानंतर १० सेकंदाचा ब्रेक घ्या आणि ३ ते ४ सेट्स करा. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.