काहीही केलं तरी वजन कमीच होत नाही? ७ चुका करणं आजपासून थांबवा, घ्या स्मार्ट फॉर्म्युला - वजन होईल झरझर कमी
Updated:April 26, 2026 16:08 IST2026-04-26T16:00:56+5:302026-04-26T16:08:34+5:30
Effective weight loss strategies for busy people: Metabolism boosting tips for weight loss: या ७ चुका करणं टाळलं तर वजन कमी होण्यास मदत होईल.

अनेकजण वजन कमी करण्यासाठी तासनतास जिममध्ये घाम गाळतात, आवडीचे पदार्थ खाणे सोडतात आणि कडक डाएटही करतात. पण काही दिवसांनंतर वजन एका विशिष्ट आकड्यावर येऊन थांबते किंवा अपेक्षेप्रमाणे कमी होत नाही. वजन कमी होणे ही केवळ कमी खाण्याची किंवा जास्त व्यायाम करण्याची प्रक्रिया नाही, तर ती एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे.(Effective weight loss strategies for busy people)
बऱ्याचदा आपण अशा काही चुका करत असतो, ज्या आपल्या शरीरातील चयापचय क्रिया मंदावतात आणि फॅट बर्निंग प्रक्रियेत अडथळा येतो. वजन कमी न होण्यामागचे फक्त आहाराच नाही तर आपली झोपण्याची पद्धत, पाणी पिण्याचे प्रमाण आणि मानसिक ताण यांसारख्या अनेक गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. पण या ७ चुका करणं टाळलं तर वजन कमी होण्यास मदत होईल. (Metabolism boosting tips for weight loss)
झोप पूर्ण न झाल्याने शरीरातील कोर्टिसोल हे तणाव वाढवणारे हार्मोन वाढते, ज्यामुळे भूक जास्त लागते आणि वजन कमी होत नाही.
पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. पाण्याच्या कमतरतेमुळे मेटाबॉलिझम मंदावते. त्यासाठी भरपूर पाणी प्यायाला हवे.
आहारात पुरेसे प्रथिने नसल्यास स्नायूंचे नुकसान होते आणि सारखी भूक लागते. त्यासाठी आहारात प्रथिने असायला हवे. सकाळी नाश्ता न केल्यास आपल्याला दुपारी जास्त भूक लागते. ज्यामुळे आपण गरजेपेक्षा जास्त जेवतो.
व्यायामात फक्त धावणे किंवा चालणे पुरेसे नाही. स्नायूंच्या मजबुतीसाठी वेट ट्रेनिंग किंवा रेझिस्टन्स ट्रेनिंग करणे देखील महत्त्वाचे आहे.
प्रक्रिया केलेल्या पदार्थात लो फॅट किंवा 'डाएट' लेबल असलेल्या पाकिटांमधील पदार्थांत साखर आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज जास्त असतात. ज्यामुळे ते खाल्ल्यास आपले वजन भरभर वाढते.
जेवताना आपण काय खातो याकडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. टीव्ही आणि मोबाईल बघत जेवल्यामुळे आपण किती खातोय याचे भान राहत नाही.
रोज वजन चेक केल्याने तणाव वाढतो. ज्यामुळे झटपट परिणामांच्या मोहात पडू नका. आठवड्यातून एकदाच वजन चेक करायला हवे.
शरीराला विश्रांती न देता सतत व्यायाम केल्याने इजा होऊ शकते आणि शरीर 'स्ट्रेस मोड'मध्ये जाऊन फॅट साठवू लागते.