केसांना दही लावण्याचे एक से एक फायदे- फक्त चमचाभर दही संपवून टाकेल केसांच्या 'या' समस्या
Updated:April 26, 2026 09:40 IST2026-04-26T09:37:43+5:302026-04-26T09:40:02+5:30

केसांच्या वेगवेगळ्या समस्या कमी करण्यासाठी दही अतिशय उपयुक्त ठरते. केसांसाठी दह्याचे वेगवेगळे फायदे कसे होऊ शकतात ते पाहुया...(curd hair mask for long and strong hair)
केसांना दही लावण्याचा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे दह्यामुळे केसांमधला कोंडा कमी होतो. यासाठी दही मात्र आंबट असावे. आंबट दह्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते फेटून घ्या आणि मग केसांच्या मुळाशी लावा. यानंतर अर्धा ते पाऊण तासाने केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय करा. केसांमधला कोंडा कमी होईल.(benefits of applying dahi or curd on hair)
केसांच्या मुळापासून ते अगदी शेवटच्या टोकापर्यंत व्यवस्थित दही लावा. यानंतर अर्ध्या तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. दह्यामधलं लॅक्टीक ॲसिड केसांना छान चमक देतं. केस काेरडे झाले असतील तर हा उपाय नक्कीच करून पाहा.
दह्यामध्ये असणारं कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, प्रोटीन केसांच्या मुळांना मजबुती देतं. यामुळे केस गळण्याचं प्रमाणही कमी होतं. त्यामुळे केस खूप पातळ झाले असतील तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नियमितपणे केसांना दही लावून पाहा.
केसांची चांगली वाढ होत नसेल तर दही आणि कडिपत्याच्या पानांची पेस्ट एकत्र करून स्काल्पला लावा. अर्ध्या तासाने केस धुवून टाका. केस पटापट वाढतील.
जर केसांना फाटे फुटत असतील तर दही लावणं फायदेशीर ठरतं. कारण दह्यामुळे केस छान मऊ होतात. त्यांना पोषण मिळून त्यांचा कोरडेपणा कमी होतो.