उन्हाळ्यात कांदा महिनाभर टिकवण्याचे सिक्रेट! उकाड्यातही कांदा राहील फ्रेश - सडणार नाही आणि कोंबही फुटणार नाही...

Updated:April 25, 2026 19:00 IST2026-04-25T19:00:00+5:302026-04-25T19:00:02+5:30

how to store onions to prevent sprouting in summer : simple ways to stop onion spoilage in hot climate : why onions sprout in summer : उन्हाळ्यात कांदा सडण्याची भीती, कोंब फुटतात ? पाहा ७ स्मार्ट ट्रिक्स - कांदा टिकेल महिनाभर चांगला...

उन्हाळ्यात कांदा महिनाभर टिकवण्याचे सिक्रेट! उकाड्यातही कांदा राहील फ्रेश - सडणार नाही आणि कोंबही फुटणार नाही...

उन्हाळ्यात उष्णतेमुळे कांद्याला लवकर कोंब येणे किंवा ते खराब होणे ही फारच कॉमन समस्या आहे. योग्य पद्धतीने साठवणूक न केल्यास कांदा नरम पडतो, वास येतो आणि लवकर खराब होतो. उन्हाळ्यात कांदा साठवणे हे गृहिणींपुढे एक मोठे आव्हानच असते, यामुळे पैशांचे नुकसान तर होतेच, पण ऐनवेळी स्वयंपाक करण्यासाठी चांगला कांदाही मिळत नाही.

उन्हाळ्यात कांदा महिनाभर टिकवण्याचे सिक्रेट! उकाड्यातही कांदा राहील फ्रेश - सडणार नाही आणि कोंबही फुटणार नाही...

कांदा जास्त दिवस ताजा ठेवण्यासाठी काही सोप्या आणि उपयुक्त घरगुती टिप्स माहिती असणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात कांद्याला कोंब येऊ नयेत आणि ते खराब होऊ नयेत यासाठी साठवणुकीच्या कोणत्या टिप्स उपयोगी पडतात ते पाहूयात.

उन्हाळ्यात कांदा महिनाभर टिकवण्याचे सिक्रेट! उकाड्यातही कांदा राहील फ्रेश - सडणार नाही आणि कोंबही फुटणार नाही...

कांदा कधीही बंद डब्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवू नका. कांद्याला मोकळ्या हवेची गरज असते. त्यामुळे कांदे नेहमी जाळीदार पिशवीत, बांबूच्या टोपलीत किंवा लाकडी क्रेटमध्ये ठेवावेत. यामुळे कांद्यातील ओलावा सुकण्यास मदत होते आणि ते सडत नाहीत.

उन्हाळ्यात कांदा महिनाभर टिकवण्याचे सिक्रेट! उकाड्यातही कांदा राहील फ्रेश - सडणार नाही आणि कोंबही फुटणार नाही...

ही सर्वात मोठी चूक आपण करतो. बटाट्यांमधून एक प्रकारचा वायू (Ethylene Gas) बाहेर पडतो, ज्यामुळे कांद्याला लवकर मोड येतात आणि ते खराब होऊ लागतात. त्यामुळे कांदा आणि बटाटा नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करून ठेवावेत.

उन्हाळ्यात कांदा महिनाभर टिकवण्याचे सिक्रेट! उकाड्यातही कांदा राहील फ्रेश - सडणार नाही आणि कोंबही फुटणार नाही...

कांद्याला थेट सूर्यप्रकाश लागेल अशा ठिकाणी ठेवू नका. उष्णतेमुळे कांद्याला कोंब येण्याची प्रक्रिया जलद होते. घराच्या अशा भागात कांदा साठवा जिथे तापमान कमी असेल आणि सूर्यप्रकाश थेट येत नसेल.

उन्हाळ्यात कांदा महिनाभर टिकवण्याचे सिक्रेट! उकाड्यातही कांदा राहील फ्रेश - सडणार नाही आणि कोंबही फुटणार नाही...

जर तुम्ही कांदे जमिनीवर किंवा रॅकमध्ये पसरून ठेवणार असाल, तर खाली वर्तमानपत्र अंथरा. वर्तमानपत्र हवेतील अतिरिक्त ओलावा शोषून घेते, ज्यामुळे कांदा कोरडा राहतो. मात्र, कांदे एकावर एक खूप रचून ठेवू नका, ते मोकळे पसरवून ठेवावेत.

उन्हाळ्यात कांदा महिनाभर टिकवण्याचे सिक्रेट! उकाड्यातही कांदा राहील फ्रेश - सडणार नाही आणि कोंबही फुटणार नाही...

अख्या कांद्याला कधीही फ्रिजमध्ये ठेवू नका. फ्रिजमधील थंडावा आणि ओलावा कांद्याला मऊ करतो आणि त्यामुळे त्याला बुरशी लागण्याची शक्यता वाढते. कांदा नेहमी रुम टेम्परेचरला चांगला टिकतो.

उन्हाळ्यात कांदा महिनाभर टिकवण्याचे सिक्रेट! उकाड्यातही कांदा राहील फ्रेश - सडणार नाही आणि कोंबही फुटणार नाही...

स्वयंपाकघरात ओलावा असेल तर कांदा खराब होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो कोरड्या ठिकाणी ठेवा.

उन्हाळ्यात कांदा महिनाभर टिकवण्याचे सिक्रेट! उकाड्यातही कांदा राहील फ्रेश - सडणार नाही आणि कोंबही फुटणार नाही...

एक कांदा खराब झाला तर बाकीच्या कांड्यांवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे खराब किंवा मऊ झालेले कांदे लगेच वेगळे काढा.