गायत्री दातारचा मेहेंदी सोहळा! हातावर रंगली नवऱ्याच्या नावाची मेहेंदी, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 18:22 IST2026-04-25T18:22:05+5:302026-04-25T18:22:27+5:30
गायत्रीच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून लगीनघटिका समीप आली आहे. ग्रहमख पार पडल्यानंतर गायत्री दातारचा मेहेंदी सोहळा पार पडला.

गायत्री दातारचा मेहेंदी सोहळा! हातावर रंगली नवऱ्याच्या नावाची मेहेंदी, पाहा व्हिडीओ
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गायत्री दातार लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. गायत्रीच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून लगीनघटिका समीप आली आहे. ग्रहमख पार पडल्यानंतर गायत्री दातारचा मेहेंदी सोहळा पार पडला. याचा व्हिडीओ समोर आला आहे. अभिनेत्रीच्या हातावर मेहेंदी रंगली आहे.
मेहेंदी सोहळ्यासाठी गायत्रीने खास हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. अगदी साधा मेकअप अभिनेत्रीने केला होता. हातावर खास हत्ती, राजहंस आणि फुलांची नक्षी गायत्रीच्या मेहेंदीमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरचा आनंदही स्पष्ट दिसत आहे. गायत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं श्रीकांत चवरे असं आहे. श्रीकांतच्या घरीही लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. श्रीकांतचं शिक्षण आयआयटी बॉम्बेमधून झालं असून तो ड्रोन फोटोग्राफर आहे. श्रीकांतला ट्रॅव्हल व फोटोग्राफीची आवड आहे.
गायत्री हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. तुला पाहते रे या मालिकेतून तिने टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. पहिल्याच मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. नंतर 'अबीर गुलाल' मालिकेत ती दिसली होती. 'बिग बॉस मराठी' आणि 'चल भावा सिटीत' या रिएलिटी शोमध्ये गायत्रीने सहभाग घेतला होता. काही महिन्यांपूर्वीच गायत्रीने प्रेमाची कबुली दिली होती.