Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 18:15 IST2026-04-25T18:14:24+5:302026-04-25T18:15:33+5:30
Raghav Chadha : भाजपा आणि आप यांच्यात 'शीशमहल २' वरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादात आता राघव चड्ढा यांनीही उडी घेतली असून आपवर निशाणा साधला आहे.

Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
भाजपा आणिआप यांच्यात 'शीशमहल २' वरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादात आता राघव चड्ढा यांनीही उडी घेतली असून आपवर निशाणा साधला आहे. ७ खासदारांसह पक्ष सोडल्यानंतर राघव चड्ढा म्हणाले की, 'आप'चा दिल्ली निवडणुकीत पराभव होण्यामागे 'शीशमहल' हे एक मोठं कारण होतं. आता एक वर्ष उलटत नाही तोच पक्ष 'शीशमहल २' वादात अडकला आहे.
राघव चड्ढा म्हणाले की, दिल्लीत तयार झालेल्या 'शीशमहल पार्ट २' चे काही फोटो समोर आले आहेत. जेव्हा पहिला 'शीशमहल' बांधला गेला होता, तेव्हाच आम आदमी पक्षाची प्रतिमा मलिन झाली होती. माझ्या मते, दिल्ली निवडणुकीत पराभवाचे सर्वात मोठं कारण कोणतं असेल, तर त्यात या 'शीशमहल'चा समावेश होता. आम आदमी पक्षाला दिल्ली निवडणूक हरून अद्याप एक वर्षही पूर्ण झालेलं नाही आणि आता 'शीशमहल पार्ट २' प्रकरण समोर आलं आहे.
#WATCH | Delhi: Rajya Sabha MP Raghav Chadha says, "Another important point is that today, Sheesh Mahal Part Two has come in Delhi. Some pictures of it have surfaced. If there was one major reason for the Aam Aadmi Party's loss in the Delhi elections, the Sheesh Mahal was one of… pic.twitter.com/jTlC9jNM8X
— ANI (@ANI) April 25, 2026
राघव चड्ढा पुढे म्हणाले की, समोर आलेले फोटो पाहिल्यास स्पष्ट होतं की, हे निवासस्थान अत्यंत आलिशान बनवण्यात आलं आहे. 'आप'ने या सर्व मुद्द्यांवर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पक्षात जे काही मोजके चांगले कार्यकर्ते उरले आहेत, ते या सर्वांना कसं उत्तर देणार? गल्ली-परिसरात जेव्हा लोक 'शीशमहल'बद्दल प्रश्न विचारतील, तेव्हा ते काय सांगणार? 'आप'ने या विषयांवर गांभीर्याने विचार केला पाहिजे.
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
'घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला'
इतर ६ खासदारांसह 'आप' सोडून भाजपामध्ये प्रवेश केल्यावर राघव चड्ढा म्हणाले की, "जो व्यक्ती 'आप'शी जोडलेला होता, तो एकतर पक्ष सोडून गेला आहे किंवा सोडत आहे. आम्ही ७ खासदारांनी मिळून पक्ष सोडला आहे. 'आप'चे नेते म्हणत आहेत की आम्ही घाबरलो आहोत, परंतु आम्ही घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला आहे."
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
प्रवेश वर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन दावा केला होता की, केजरीवाल यांचा नवा बंगला अत्यंत भव्य आणि आलिशान आहे. काही फोटो प्रसिद्ध करून त्यांनी या बंगल्याचा उल्लेख 'शीशमहल-२' असा केला होता. "केजरीवाल यांनी सांगावं की या नव्या बंगल्यावर किती पैसा खर्च केला आहे आणि हा पैसा कोणाचा आहे?" असंही म्हटलं आहे.