इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 20:40 IST2026-04-25T20:40:08+5:302026-04-25T20:40:33+5:30

अमेरिका आणि इराणमधील दुसऱ्या फेरीच्या शांतता चर्चेपूर्वी इराणने अमेरिकेवर जोरदार टीका केली आहे.

Excitement even before the talks in Islamabad! Iran's sharp attack on America; said "To save face.." | इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."

इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."

अमेरिका आणि इराणमधील दुसऱ्या फेरीच्या शांतता चर्चेसाठी इस्लामाबाद सज्ज झाले असले, तरी दोन्ही देशांमधील वाकयुद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. "अमेरिका सध्या युद्धाच्या अशा दलदलीत अडकली आहे की, आता तिथून बाहेर पडण्यासाठी ती केवळ एक सन्मानजनक रस्ता शोधत आहे," असा खोचक टोला इराणच्या संरक्षण मंत्रालयाने लगावला आहे. या विधानामुळे चर्चेपूर्वीच वातावरणात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.

इराणचा थेट चर्चेला नकार

अमेरिकेचे विशेष दूत स्टीव विटकॉफ आणि जेरेड कुशनर हे इराणच्या प्रतिनिधींची भेट घेण्यासाठी पाकिस्तानात दाखल होत आहेत. व्हाईट हाऊसने या बैठकीतून सकारात्मक निकालाची अपेक्षा व्यक्त केली असली, तरी इराणने मात्र अमेरिकेच्या आशेवर पाणी फेरले आहे. "आम्ही अमेरिकेशी कोणतीही थेट चर्चा करणार नाही," असे इराणच्या सरकारी माध्यमांनी स्पष्ट केले आहे. इराणने आपल्या मागण्या आणि अमेरिकेच्या प्रस्तावावरील हरकती आधीच पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडे सोपवल्या आहेत.

तुर्कीची एन्ट्री; होर्मुझमधील मॉइन्स काढणार?

या संपूर्ण वादात आता तुर्कीने महत्त्वाची भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांनी सांगितले की, "जर अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार झाला, तर होर्मुज सामुद्रधुनीतील बारूदी सुरंग हटवण्याच्या मोहिमेत तुर्की सहभागी होऊ शकते." हा एक मानवी कर्तव्य म्हणून तांत्रिक मदतीचा भाग असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इस्लामाबादमध्ये लॉकडाऊन सदृश परिस्थिती

या हाय-प्रोफाईल शांतता चर्चेमुळे इस्लामाबादमध्ये सध्या कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. शहरात एका आठवड्यापासून कडक निर्बंध लागू असून, रेड झोनकडे जाणारे रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. प्रमुख चौकांमध्ये लष्कर आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गांवरही प्रवाशांची कडक तपासणी केली जात आहे. एकप्रकारे शांतता चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये जणू लॉकडाऊनच लागल्याचे चित्र आहे. आता उद्या होणाऱ्या या चर्चेतून जगावरील युद्धाचे ढग विरळ होणार की इराणच्या ताठर भूमिकेमुळे पेच अधिक वाढणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title : इस्लामाबाद वार्ता से पहले ईरान ने अमेरिका को ताना मारा: 'इज्जत बचाओ'

Web Summary : इस्लामाबाद में वार्ता से पहले, ईरान ने अमेरिका के साथ सीधी बातचीत को खारिज कर दिया, और कहा कि वह युद्ध के दलदल में फंसा हुआ है और सम्मानजनक निकास की तलाश में है। तुर्की ने शांति समझौते पर पहुंचने पर होर्मुज में बारूदी सुरंगों को हटाने में मदद की पेशकश की। इस्लामाबाद में कड़ी सुरक्षा है।

Web Title : Iran Taunts US Before Islamabad Talks: 'Saving Face'

Web Summary : Ahead of Islamabad talks, Iran dismisses direct dialogue with the US, calling it stuck in a war quagmire seeking a dignified exit. Turkey offers help removing mines in Hormuz if a peace deal is reached. Islamabad is under high security.