होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 20:22 IST2026-04-25T20:19:02+5:302026-04-25T20:22:56+5:30

Iran US Conflict 2026: अमेरिकेकडून होर्मुझ सामुद्रधुनी इराणची नाकेबंदी करण्यात आली आहे. अमेरिकेच्या या नाकेबंदीनंतर आता होर्मुझध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. 

Conflict will flare up in Hormuz! Iran said, 'If the blockade is not lifted, we will now respond to America' | होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"

होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"

Iranian Navy warning to USA: पश्चिम आशियातील संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेसोबतची चर्चा थांबलेली असतानाच आता इराणने जशास तसे उत्तर देण्याची भाषा केली आहे. अमेरिकेने जर होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदी कायम ठेवली तर आम्ही प्रत्युत्तरात कारवाई करू, असा इशारा इराणने दिला आहे. त्यामुळे होर्मुझमध्ये पुन्हा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता गडद झाली आहे. 

इराणचे लष्कर आयआरजीसीच्या कमांड सेंटरकडून ही भूमिका मांडण्यात आली आहे. इराणच्या सरकारी माध्यम संस्थांनी हे इराणी लष्कराचे निवेदन प्रसिद्ध केले असून, तस्नीम वृत्त संस्थेने रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. 

अमेरिकी लष्कराने जर युद्धक्षेत्रात नाकेबंदी, समुद्रात लुटालूट आणि दरोडा टाकणे सुरूच ठेवले, तर त्यांना इराणी लष्कराकडून दिल्या जाणाऱ्या कारवाईचा सामना करावा लागेल, असा इशारा आयआरजीसीने अमेरिकेला दिला आहे. 

दोन आठवड्यांपासून नाकेबंदी

पाकिस्तानमध्ये चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेने १३ एप्रिल रोजी इराणच्या बंदराची नाकेबंदी केली. इराणच्या बंदरांमध्ये जाणारी आणि येणारी जहाजे अमेरिकेच्या लष्कराकडून रोखण्यात आली आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव कायम आहे.

अमेरिकेची नाकेबंदी असतानाही इराणने तीन मालवाहू जहाजांवर हल्ला करत दोन जहाजे ताब्यात घेतली आहे. त्यात एक जहाज हे भारतात येणार होते. 

अमेरिकेशी थेट चर्चा करणार नाही

दरम्यान, इराण अमेरिकेसोबत थेट चर्चा करण्यास नकार दिला आहे. आता अमेरिकेसोबत थेट चर्चा केली जाणार नाही. जी काही चर्चा होईल, ती पाकिस्तानच्या माध्यमातून होईल. 

इरणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हेही पाकिस्तानला पोहोचले आहेत. त्यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार, लष्करप्रमुख आसिम मुनीर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. 

त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासोबतही बैठक झाली. अमेरिकेच्या भूमिकेबद्दल असलेले मुद्दे अराघची यांनी बैठकीत मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title : ईरान की अमेरिका को चेतावनी: होर्मुज नाकेबंदी हटी तो देंगे जवाब

Web Summary : पश्चिम एशिया में तनाव बढ़ गया है क्योंकि ईरान ने अमेरिका द्वारा होर्मुज जलडमरूमध्य की नाकेबंदी जारी रखने पर जवाबी कार्रवाई की धमकी दी है। ईरान सीधी बातचीत से इनकार करता है, पाकिस्तान को मध्यस्थ के रूप में शामिल करता है। अमेरिकी नाकेबंदी दो सप्ताह से जारी है, जिससे क्षेत्रीय अस्थिरता बढ़ गई है।

Web Title : Iran Warns US: Retaliation if Hormuz Blockade Isn't Lifted

Web Summary : Tensions escalate in West Asia as Iran threatens retaliation if the US continues its Hormuz Strait blockade. Iran rejects direct talks, engaging Pakistan as mediator. The US blockade has been ongoing for two weeks, heightening regional instability.