पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 18:45 IST2026-04-25T18:43:33+5:302026-04-25T18:45:27+5:30

Pune Crime : या घटनेमुळे २०१२ मधील कुप्रसिद्ध संतोष माने प्रकरणाची आठवण ताजी झाली. २५ जानेवारी २०१२ रोजी संतोष माने याने स्वारगेट येथून एसटी बस पळवून शहरात भीषण हल्ला केला होता.

Pune Crime There was a lot of excitement in Pune The Santosh Mane case was repeated. | पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली

पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली

- किरण शिंदे

पुणे -  
शहरातील डेक्कन परिसरात शनिवारी दुपारी मोठा थरार पाहायला मिळाला. एका मद्यधुंद व्यक्तीने सार्वजनिक वाहतुकीची बस पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली. महाराष्ट्र बँक चौकाजवळून सुरू झालेला हा प्रकार गुडलक चौक, कारंजी मार्गे पुन्हा डेक्कन बस स्थानकापर्यंत पोहोचला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

 

अधिकच्या माहितीनुसार,  कलाकार कट्ट्यावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे त्या भागात पोलीस आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून संबंधित बस अडवली आणि चालकाला ताब्यात घेतले. पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

या घटनेमुळे २०१२ मधील कुप्रसिद्ध संतोष माने प्रकरणाची आठवण ताजी झाली. २५ जानेवारी २०१२ रोजी संतोष माने याने स्वारगेट येथून एसटी बस पळवून शहरात भीषण हल्ला केला होता. त्या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला होता, तर २७ जण जखमी झाले होते. तसेच अनेक वाहनांचेही मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने, डेक्कनमधील ताज्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर मानला जात असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : पुणे: नशे में धुत व्यक्ति ने बस हाईजैक करने की कोशिश, 2012 की घटना की याद आई।

Web Summary : पुणे में एक नशे में धुत व्यक्ति ने बस को हाईजैक कर लिया, जिससे 2012 की संतोष माने त्रासदी की याद ताजा हो गई। पुलिस ने तुरंत हस्तक्षेप किया, जिससे कोई हताहत नहीं हुआ। जांच जारी है।

Web Title : Pune: Drunk man attempts bus hijacking, echoes 2012 incident.

Web Summary : A drunk man hijacked a bus in Pune, reminiscent of the 2012 Santosh Mane tragedy. Police swiftly intervened, preventing casualties. An investigation is ongoing.