काही खा तुम्हाला मीठ कमीच वाटतं? खारट चव आवडू लागली तर तब्येत बिघडतेय-तपासा ७ लक्षणं आजच..

Updated:April 24, 2026 15:41 IST2026-04-24T12:29:50+5:302026-04-24T15:41:41+5:30

Salt Craving Causes : पुन्हा पुन्हा जास्त मीठ किंवा चटपटीत काही खाण्याची इच्छा शरीरात झालेल्या असंतुलनाकडे इशारा करते. कशामुळे असं होतं हे पाहुयात, जेणेकरून जास्त मीठ खाणं टाळता येईल.

काही खा तुम्हाला मीठ कमीच वाटतं? खारट चव आवडू लागली तर तब्येत बिघडतेय-तपासा ७ लक्षणं आजच..

Reasons Behind Salt Cravings : मिठाशिवाय काही खाण्याचा विचार देखील करवत नाही. म्हणजे मिठाशिवाय पदार्थ बेचव लागतील. पण मीठ योग्य प्रमाणात खाल्लं तरच चांगलं असतं. जास्त खाल तर तब्येत बिघडू शकते. बरेच लोक असे असतात ज्यांना पुन्हा पुन्हा जास्त मीठ किंवा चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण ही पुन्हा पुन्हा जास्त मीठ किंवा चटपटीत काही खाण्याची इच्छा शरीरात झालेल्या असंतुलनाकडे इशारा करते. कशामुळे असं होतं हे पाहुयात, जेणेकरून जास्त मीठ खाणं टाळता येईल. (Image Credit : Social Media)

काही खा तुम्हाला मीठ कमीच वाटतं? खारट चव आवडू लागली तर तब्येत बिघडतेय-तपासा ७ लक्षणं आजच..

सगळ्यांनाच कल्पना आहे की, मीठ शरीरासाठी फार आवश्यक तत्व आहे. पण याचं प्रमाण संतुलित असणं फार महत्वाचं आहे. हल्ली तर आधीच प्रोसेस्ड फूड, फास्ट फूड किंवा पॅकेज्ड फूडमध्ये मीठ जास्त असतं. तरीही काही लोकांना पुन्हा पुन्हा खारट किंवा चटपटीत काही खाण्याची इच्छा होते. एक्सपर्ट सांगतात की, हा केवळ टेस्टपुरता मर्यादित मुद्दा नाही. हा शरीरात आरोग्यासंबंधी झालेल्या काही बदलांचा संकेत असू शकतो.

काही खा तुम्हाला मीठ कमीच वाटतं? खारट चव आवडू लागली तर तब्येत बिघडतेय-तपासा ७ लक्षणं आजच..

हेल्थलाईनच्या एका रिपोर्टनुसार, मीठ खाण्याचं मन होण्याचं सगळ्यात कॉमन कारण डिहायड्रेशन सांगितलं जातं. जेव्हा शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होतं, तेव्हा इलेक्ट्रोलाइ्टसचं संतुलन बिघडतं. अशात शरीर मिठाची मागणी करू लागतं. शिवाय चक्कर येणे, जास्त तहान लागणे, डोकेदुखी आणि लघवी कमी येणे अशीही लक्षणे दिसतात. जर वेळीच काही केलं नाही तर स्थिती गंभीर होऊ शकते.

काही खा तुम्हाला मीठ कमीच वाटतं? खारट चव आवडू लागली तर तब्येत बिघडतेय-तपासा ७ लक्षणं आजच..

जास्त काळ राहणाऱ्या तणावामुळे सु्द्धा मीठ खाण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. संशोधनात आढळंय की, जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा मेंदू आनंद देणारे डोपामाइन हार्मोन्स रिलीज करतो, ज्यामुळे चटपटीत-खारट काही खाण्याची इच्छा वाढते. हे मानलं जातं की, स्ट्रेस आणि खाण्याची इच्छा यांचा संबंध खोलवर असतो. (Image Credit : health.clevelandclinic.org)

काही खा तुम्हाला मीठ कमीच वाटतं? खारट चव आवडू लागली तर तब्येत बिघडतेय-तपासा ७ लक्षणं आजच..

मीठ खाण्याची इच्छा होणं हे एडिसन्स डिसीजचं लक्षण असू शकतं. या आजारात एड्रिनल ग्लँड्स पुरेशा प्रमाणात कोर्टिसोल आणि एल्डोस्टेरॉन हार्मोन तयार करू शकत नाही, ज्यामुळे शरीरात सोडिअम कमी होतं. या स्थितीत व्यक्तीला मीठ खाण्याची तीव्र इच्छा होते. सोबतच कमजोरी, लो ब्लड प्रेशर, वजन कमी होणे आणि चक्कर येणे अशीही लक्षणे दिसतात. (Image Credit : medicalnewstoday.com)

काही खा तुम्हाला मीठ कमीच वाटतं? खारट चव आवडू लागली तर तब्येत बिघडतेय-तपासा ७ लक्षणं आजच..

बार्टर सिंड्रोम नावाच्या किडनीसंबंधी आजारामुळे देखील खारट काही खाण्याची इच्छा होते. या आजारात शरीर सोडिअमला योग्यपणे रिअॅब्जॉर्ब करू शकत नाही आणि ते लघवीवाटे बाहेर पडतं. ज्यामुळे शरीरात सोडिअम कमी होतं आणि आपल्याला पुन्हा पुन्हा मीठ खाण्याची इच्छा होते. लहान मुलांमध्ये ही समस्या बघायला मिळू शकते. (Image Credit : exaskidneyinstitute.com)

काही खा तुम्हाला मीठ कमीच वाटतं? खारट चव आवडू लागली तर तब्येत बिघडतेय-तपासा ७ लक्षणं आजच..

सिस्टिक फायब्रोसिस हा एक आनुवांशिक आजार आहे, ज्यात शरीरातील सोडिअम कमी होतं. ज्यामुळे मीठ खाण्याची इच्छा निर्माण होते. या आजारात घामाच्या माध्यमातून शरीरातील मीठ जास्त बाहेर पडतं, ज्यामुळे सोडिअमचं प्रमाण कमी होतं. अशा लोकांची त्वचा खारट लागते आणि त्यांना जास्त खारट खाण्याची इच्छा होते. (Image Credit : newportchildren.com)

काही खा तुम्हाला मीठ कमीच वाटतं? खारट चव आवडू लागली तर तब्येत बिघडतेय-तपासा ७ लक्षणं आजच..

जास्त मीठ खाण्याची इच्छा होते असेल तर याचं आणखी एक कारण म्हणजे मायग्रेन असू शकतं. मायग्रेनने पीडित असलेल्यांना डोकेदुखीदरम्यान किंवा त्याआधी खारट वा गोड काही खाण्याची इच्छा होऊ शकते. काही केसेसमध्ये खारट काही खाल्लं तर वेदना कमी होतात. पण हे सगळ्यांसोबत होईल असं नाही. (Image Credit : eroftexas.com)

काही खा तुम्हाला मीठ कमीच वाटतं? खारट चव आवडू लागली तर तब्येत बिघडतेय-तपासा ७ लक्षणं आजच..

काही औषधांमुळेही मीठ खाण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. काही औषधांमुळे एड्रिनल ग्लँड्स प्रभावित होतात. ज्यामुळे शरीरातील हार्मोन असंतुलित होऊ शकतात आणि मीठ खाण्याची इच्छा होऊ शकते. अशात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (Image Credit : businessinsider.com)