तुमच्या ८ सवयी ऑफिसमध्ये तुम्हाला करतात बदनाम! करिअर होण्यापूर्वीच संपेल - करा ‘हे’ बदल आजच...

Updated:April 23, 2026 20:05 IST2026-04-23T20:00:15+5:302026-04-23T20:05:01+5:30

habits that create negative image at workplace : bad office habits to avoid : 8 habits that can ruin your reputation at office : ऑफिस इमेज सुधारण्यासाठी सोप्या टिप्स, कामासोबतच वागणंही तितकंच महत्त्वाचं...

तुमच्या ८ सवयी ऑफिसमध्ये तुम्हाला करतात बदनाम! करिअर होण्यापूर्वीच संपेल - करा ‘हे’ बदल आजच...

ऑफिसमध्ये बोललेला प्रत्येक शब्द आणि केलेली प्रत्येक कृती तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असते. ऑफिसमधील तुमची प्रत्येक कृती आणि बोललेला प्रत्येक शब्द तुमच्या ऑफिसमधील इमेजवर खोलवर परिणाम करत असतो. अनेकदा आपण कळत-नकळत अशा काही गोष्टी बोलतो किंवा करतो, ज्या आपल्याला 'अनप्रोफेशनल' सिद्ध करतात. ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या नजरेत आपली इमेज कधी नकारात्मक होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे वेळेतच स्वतःच्या सवयींमध्ये बदल करणे अत्यंत गरजेचे आहे(habits that ruin professional image).

तुमच्या ८ सवयी ऑफिसमध्ये तुम्हाला करतात बदनाम! करिअर होण्यापूर्वीच संपेल - करा ‘हे’ बदल आजच...

ऑफिसमध्ये तुमची प्रगती केवळ तुमच्या कामावर नाही, तर तुमच्या (8 habits that can ruin your reputation at office) वागण्यावरही अवलंबून असते. अनेकदा आपण खूप मेहनत करतो, पण कळत-नकळत अशा काही गोष्टी बोलतो किंवा करतो, ज्या आपली 'अनप्रोफेशनल' इमेज तयार करतात. ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या नजरेत तुमची इमेज कधी नकारात्मक होईल, हे सांगता येत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं काम चांगलं असूनही तुम्हाला हवं तसं महत्त्व मिळत नाहीये, तर ऑफिसमध्ये आपली छाप कशी पाडायची आणि कोणत्या सवयींना वेळीच सोडून द्यावं ते पाहूयात.

तुमच्या ८ सवयी ऑफिसमध्ये तुम्हाला करतात बदनाम! करिअर होण्यापूर्वीच संपेल - करा ‘हे’ बदल आजच...

काहींना सतत बोलण्याची सवय असते, पण ही सवय ऑफिसमध्ये तुमची प्रतिमा नकारात्मक बनवू शकते. नेहमी स्वतःच बोलण्यापेक्षा इतरांचे ऐकून घेण्याची वृत्ती (Listening Skills) अंगीकारणे अत्यंत गरजेचे आहे. समोरच्याचे बोलणे मध्येच तोडून स्वतःचीच स्तुती करणाऱ्या व्यक्ती कोणालाही आवडत नाहीत. त्यामुळे, कामाच्या ठिकाणी मोजकेच आणि मुद्द्याचे बोलण्याचा प्रयत्न करा.

तुमच्या ८ सवयी ऑफिसमध्ये तुम्हाला करतात बदनाम! करिअर होण्यापूर्वीच संपेल - करा ‘हे’ बदल आजच...

जर तुम्हाला ऑफिसला नेहमी उशिरा येण्याची सवय असेल, तर ही सवय अजिबात योग्य नाही आणि ती त्वरित बदलली पाहिजे. तुमच्या या सवयीमुळे सहकारी आणि वरिष्ठांच्या नजरेत तुमची इमेज एक 'नकारात्मक' व्यक्ती म्हणून तयार होऊ शकते. जर तुम्हाला उशिरा येण्याबद्दल वारंवार टोकले जात असेल आणि तरीही तुम्ही स्वतःत बदल करत नसाल, तर भविष्यात हे तुमच्या करिअरसाठी मोठ्या संकटाचे कारण ठरू शकते.

तुमच्या ८ सवयी ऑफिसमध्ये तुम्हाला करतात बदनाम! करिअर होण्यापूर्वीच संपेल - करा ‘हे’ बदल आजच...

जर तुम्हाला प्रत्येक छोटी गोष्ट मोठी करून सांगण्याची किंवा साध्या विषयाला विनाकारण खेचण्याची सवय असेल, तर लोकांच्या नजरेत तुमची प्रतिमा खराब होत आहे. या सवयीवर तुम्हाला गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. जर एखाद्या गोष्टीचे उत्तर 'हो' किंवा 'नाही' मध्ये अपेक्षित असेल, तर ते मोजक्या शब्दांतच द्यायला शिका. मुद्द्याचं आणि स्पष्ट बोलणाऱ्या व्यक्तीलाच प्रोफेशनल जगात मान मिळतो.

तुमच्या ८ सवयी ऑफिसमध्ये तुम्हाला करतात बदनाम! करिअर होण्यापूर्वीच संपेल - करा ‘हे’ बदल आजच...

जर तुम्ही ऑफिसमध्ये इतरांच्या गोष्टी ऐकून त्या तिसऱ्याला सांगत असाल (चुगल्या करत असाल), तर तुमची प्रतिष्ठा पूर्णपणे धुळीला मिळू शकते. ही एक अशी सवय आहे जी तुमची प्रोफेशनल इमेज सर्वात वेगाने खराब करते. त्यामुळे जे काही बोलायचे असेल ते अत्यंत विचारपूर्वक बोला. लक्षात ठेवा, विश्वासार्हता एकदा गमावली की ती परत मिळवणे कठीण असते.

तुमच्या ८ सवयी ऑफिसमध्ये तुम्हाला करतात बदनाम! करिअर होण्यापूर्वीच संपेल - करा ‘हे’ बदल आजच...

जर तुम्ही ऑफिसमध्ये कामाच्या वेळेत बसून तुमच्या खाजगी आयुष्याबद्दल किंवा वैयक्तिक विषयांवर जास्त चर्चा करत असाल, तर तुम्ही तिथले व्यावसायिक वातावरण खराब करत आहात. ही सवय तुम्हाला त्वरित बदलणे आवश्यक आहे. जास्त वैयक्तिक चर्चा केल्यामुळे कधीकधी तुम्हाला किंवा समोरच्या व्यक्तीला अवघडल्यासारखे वाटू शकते. ऑफिसमध्ये कोणाशीही प्रमाणापेक्षा जास्त जवळीक साधणे किंवा खाजगी गोष्टी शेअर करणे टाळलेलेच कधीही चांगले.

तुमच्या ८ सवयी ऑफिसमध्ये तुम्हाला करतात बदनाम! करिअर होण्यापूर्वीच संपेल - करा ‘हे’ बदल आजच...

काही लोकांना प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करण्याची सवय असते—मग ते काम असो, ऑफिसमधील वातावरण असो किंवा एखादा सहकारी. सततची नकारात्मकता तुम्हाला एक 'कटकटी' व्यक्ती म्हणून सिद्ध करते. तक्रार करण्याऐवजी उपाय शोधण्यावर भर द्या.

तुमच्या ८ सवयी ऑफिसमध्ये तुम्हाला करतात बदनाम! करिअर होण्यापूर्वीच संपेल - करा ‘हे’ बदल आजच...

टीममध्ये काम करताना दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय स्वतः घेण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्याबद्दल द्वेष निर्माण होऊ शकतो. चांगला लीडर तोच असतो जो आपल्या टीमच्या यशाचे कौतुक करतो आणि सर्वांना सोबत घेऊन चालतो.

तुमच्या ८ सवयी ऑफिसमध्ये तुम्हाला करतात बदनाम! करिअर होण्यापूर्वीच संपेल - करा ‘हे’ बदल आजच...

ऑफिसमध्ये वावरताना तुमची बसण्याची पद्धत, संवाद साधताना नजरेला नजर न देणे किंवा सतत मोबाईलमध्ये बघणे यामुळे तुम्ही 'अप्रोचेबल' वाटत नाही. तुमची बॉडी लँग्वेज आत्मविश्वासू आणि सकारात्मक असणे गरजेचे आहे.