हनुवटीखालची-गळ्यावरची चरबी ७ दिवसांत कमी! रोज १० मिनिटे करा फेस योगा- जिमशिवाय मिळेल परफेक्ट 'जॉ लाईन'- दिसाल तरुण
Updated:April 23, 2026 21:00 IST2026-04-23T21:00:00+5:302026-04-23T21:00:01+5:30
Daily 10 minute face yoga routine: Anti-aging facial yoga for youthful skin: चेहऱ्यावरचे फॅट कमी करण्यासाठी योगासने

अनेकांचे शरीर फिट असते, पण चेहऱ्यावर आणि हनुवटीखाली जमा झालेली चरबी आपल्या सौंदर्यात बाधा आणण्याचे काम करते. चेहऱ्यावर चरबी वाढल्यामुळे आपलं वय देखील जास्त वाटू लागते आणि आत्मविश्वासही कमी होतो. तासन्तास जिममध्ये घाम गाळून पोटाची चरबी कमी करणं सोपे असते. पण चेहऱ्यावरची चरबी कमी करणं कठीण. (Daily 10 minute face yoga routine)
बऱ्याचदा चुकाची आहार, व्यायामाचा अभाव, अनुवांशिकता किंवा सतत खाली मान घालून मोबाईल वापरल्यामुळे गळ्यावरची चरबी वाढते. ही चरबी कमी करण्यासाठी महागड्या कॉस्मेटिक सर्जरीची गरज नाही. फक्त रोज १० मिनिटे फेस योगा केल्यास आपल्याला फायदा होईल. हा फेस योगा नियमितपणे केल्यास ७ दिवसांत आपल्याला फरक पाहायला मिळेल. (Anti-aging facial yoga for youthful skin)
फिश फेस हा सर्वात सोपा व्यायाम आहे. आपले गाल आतल्या बाजूला ओढून माशासारखा चेहरा करा. याच स्थितीत ५ ते १० सेकंद राहा आणि हसण्याचा प्रयत्न करा. हे दिवसातून १० ते १५ वेळा केल्याने गालावरची चरबी कमी होते.
नेक लिफ्ट किंवा स्काय किस सरळ उभं राहून मान वरच्या दिशेला करा. आता आभाळाला किस करत आहात अशा प्रकारे ओठांची हालचाल करा. यामुळे गळ्याच्या स्नायूंवर ताण येतो आणि डबल चिन कमी होण्यास मदत होईल.
जीभ बाहेर काढणे आपली मान सरळ ठेवा आणि शक्य तितकी जीभ बाहेर काढा. यामुळे हनुवटीच्या खालच्या स्नायूंचे टोनिंग होते. हा व्यायाम १० वेळा करा.
जॉ प्रोत्रुजन खालचा जबडा बाहेरच्या दिशेला ढकला आणि खालचे ओठ वरच्या ओठावर चढवण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत मानेवर ताण येईल. याच स्थिती ५ सेकंद राहा आणि मग सोडा. यामुळे जॉलाईन शार्प होण्यास मदत होईल.
शरीरातील पाणी कमी असल्यास चेहरा सुजल्यासारखा दिसतो. त्यामुळे दिवसाला किमान ३ ते ४ लिटर पाणी प्या. अति मीठ खाल्ल्याने देखील चेहऱ्यावर सूज येते.