"मी आणि जमील साहेब मिळून पाकिस्तान..."; रिझवानने सांगितली 'धुरंधर २'च्या पुढची कहाणी, वाचून चकीत व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 15:18 IST2026-04-24T15:16:19+5:302026-04-24T15:18:43+5:30

पाकिस्तानात भारतीय एजंट म्हणून काम करणाऱ्या जमील जमाली आणि रिझवानचं काय होईल? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. अखेर याविषयी सिनेमात रिझवानची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने खुलासा केला आहे.

after dhurandhar 2 what is next story rizwan actor mustafa ahmad talk about this | "मी आणि जमील साहेब मिळून पाकिस्तान..."; रिझवानने सांगितली 'धुरंधर २'च्या पुढची कहाणी, वाचून चकीत व्हाल

"मी आणि जमील साहेब मिळून पाकिस्तान..."; रिझवानने सांगितली 'धुरंधर २'च्या पुढची कहाणी, वाचून चकीत व्हाल

'धुरंधर २' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. 'धुरंधर' आणि 'धुरंधर २' मिळून दोन्ही सिनेमांनी २००० कोटींची कमाई केली आहे. 'धुरंधर २'च्या शेवटी दिसलं पाकिस्तानात भारतीय एजंट म्हणून काम करणारा हमजा नंतर भारतात येतो. पुढे कथा कशी वळण घेईल? पाकिस्तानातच भारतीय एजंट म्हणून काम करणाऱ्या जमील जमाली आणि रिझवानचं काय होईल? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. अखेर याविषयी सिनेमात रिझवानची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने खुलासा केला आहे.

हमजा 'किंग ऑफ लियारी' बनल्यानंतर रिझवान त्याचा सर्वात विश्वासू साथीदार बनतो. मात्र, जेव्हा हमजाची खरी ओळख उघड होते, तेव्हा त्याला भारतात परतणे भाग पडते आणि रिझवान तिथे एकटा पडतो. हमजाच्या अनुपस्थितीत आता रिझवान पुढे काय करणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

यावर इंस्टाग्रामवरील एका 'आस्क मी एनीथिंग' सेशनमध्ये रिझवानची भूमिका साकारणाऱ्या मुस्तफा अहमदने भाष्य केले आहे. तो म्हणाला, "मला वाटते की रिझवान तिथूनच सुरुवात करेल जिथे हमजा सोडून गेला होता. रिझवानची खरी ओळख अजून कोणालाच माहित नाही आणि तो आधीच खूप चांगल्या स्थितीत आहे. तो उरलेल्या शत्रूंना संपवत सहज पुढे जाऊ शकतो. त्याच्यामध्ये तशी ताकद नक्कीच आहे."

चाहत्यांमध्ये अशीही चर्चा आहे की, रिझवान आता जमील जमाली (राकेश बेदी यांची भूमिका) सोबत हातमिळवणी करू शकतो. जमील हा देखील पाकिस्तानच्या राजकारणात दडलेला एक भारतीय एजंट आहे. या शक्यतेवर मुस्तफाने मिश्किल टिप्पणी करत म्हटले, "नक्कीच! मी आणि जमील साहेब मिळून पाकिस्तान सांभाळू शकतो. आणि खरं सांगायचं तर, तिथल्या नेत्यांपेक्षा आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने आणि त्यांच्याच फायद्यासाठी काम करू.", अशाप्रकारे मुस्तफाने 'धुरंधर २' नंतरचं कथानक पुढे कसं वळण घेईल, हे सांगितलं आहे.

Web Title : रिज़वान का खुलासा: 'मैं और जमील मिलकर पाकिस्तान पर राज करेंगे!'

Web Summary : 'धुरंधर 2' के बाद, रिज़वान पाकिस्तान में एक और भारतीय एजेंट जमील जमाली के साथ हाथ मिला सकते हैं। अभिनेता मुस्तफा अहमद ने संकेत दिया कि वे पाकिस्तान को उसके वर्तमान नेताओं से बेहतर ढंग से प्रबंधित कर सकते हैं, जिससे प्रशंसक संभावित कहानी को लेकर उत्साहित हैं।

Web Title : Rizwan reveals 'Dhurandhar 2' sequel: 'Me and Jamil will rule Pakistan!'

Web Summary : After 'Dhurandhar 2', Rizwan might join hands with Jamil Jamali, another Indian agent in Pakistan. Actor Mustafa Ahmed hinted they could manage Pakistan better than its current leaders, exciting fans about the potential storyline.