राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 16:30 IST2026-04-24T16:28:47+5:302026-04-24T16:30:37+5:30

Raghav Chadha joins BJP news update: राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत संदीप पाठक, हरभजन सिंह आणि स्वाती मालीवाल यांच्यासह ८ खासदार भाजपमध्ये जाणार आहेत. वाचा सविस्तर बातमी.

AAP Party Clash: Those who were made leaders in the Rajya Sabha by removing Raghav Chadha did the same...; Swati Maliwala's name is also among those 7 MP's joining BJP | राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव

राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव

 

शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत राघव चड्ढा यांनी खळबळजनक घोषणा करत आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. विशेष म्हणजे, अवघ्या १५ दिवसांपूर्वी चड्ढा यांच्या जागी राज्यसभेत पक्षाचे उपनेते म्हणून नियुक्त झालेले अशोक मित्तल हे देखील आता भाजपमध्ये सामील होणार आहेत.

पत्रकार परिषदेत चड्ढा भावूक झाले होते. ते म्हणाले, "ज्या आदर्शांसाठी आणि मूल्यांसाठी आम आदमी पक्षाची स्थापना झाली होती, त्यापासून पक्ष आता पूर्णपणे भरकटला आहे. मी पक्षापासून दूर जात असून जनतेच्या दिशेने पाऊल टाकत आहे."

राज्यसभेत 'आप'चे विलीनीकरण: गणिते काय?
राघव चड्ढा यांनी दावा केला आहे की, राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या एकूण १० खासदारांपैकी २/३ पेक्षा जास्त (म्हणजेच ८ खासदार) भाजपमध्ये विलीन होण्यास तयार आहेत. विलीनीकरणासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आणि स्वाक्षऱ्या राज्यसभेच्या सभापतींकडे सोपवण्यात आल्या आहेत.

भाजपमध्ये सामील होणारे प्रमुख चेहरे:
१. राघव चड्ढा
२. अशोक मित्तल: राज्यसभेतील उपनेते (पंजाब).
३. स्वाती मालीवाल: दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा.
४. संदीप पाठक: राष्ट्रीय संघटन सरचिटणीस.
५. हरभजन सिंह: माजी क्रिकेटपटू (पंजाब).
६. बलबीर सिंह सीचेवाल: पर्यावरणवादी (पंजाब).
७. विक्रमजीत सिंह साहनी: प्रसिद्ध उद्योजक (पंजाब).
८. राजिंदर गुप्ता: (पंजाब).

Web Title : आप नेताओं का बीजेपी में पलायन: राघव चड्ढा का इस्तीफा, अन्य भी शामिल

Web Summary : राघव चढ्ढा यांनी आदर्श विचलनाचे कारण देत आप मधून राजीनामा दिला. अशोक मित्तल, ज्यांची नुकतीच राज्यसभा उपनेता म्हणून नियुक्ती झाली, आणि स्वाती मालीवाल देखील भाजपा मध्ये सामील होत आहेत. चढ्ढा यांचा दावा आहे की आप चे आठ राज्यसभा खासदार पक्ष बदलण्यासाठी तयार आहेत.

Web Title : AAP Leaders Defect to BJP: Raghav Chadha Resigns, Others Follow

Web Summary : Raghav Chadha resigned from AAP, citing আদর্শ বিচ্যুতি. Ashok Mittal, recently appointed Rajya Sabha deputy leader, and Swati Maliwal are also reportedly joining BJP. Chadha claims eight AAP Rajya Sabha MPs are ready to defect.