Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण

एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण

तुम्ही पूर्णपणे फिट आणि हेल्दी दिसता, तरीही तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका असू शकतो? हा प्रश्न ऐकायला कदाचित विचित्र वाटेल, पण हेच सत्य आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 18:08 IST2026-04-24T18:07:11+5:302026-04-24T18:08:07+5:30

तुम्ही पूर्णपणे फिट आणि हेल्दी दिसता, तरीही तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका असू शकतो? हा प्रश्न ऐकायला कदाचित विचित्र वाटेल, पण हेच सत्य आहे.

can you be fit and still have heart attack experts reveal hidden risks | एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण

एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण

तुम्ही पूर्णपणे फिट आणि हेल्दी दिसता, तरीही तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका असू शकतो? हा प्रश्न ऐकायला कदाचित विचित्र वाटेल, पण हेच सत्य आहे. अनेकदा आपण असा विचार करतो की, जर आपला आहार चांगला असेल, आपण थोडा व्यायाम करत असू आणि एक्टिव्ह असू, तर आपलं हृदय पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र वास्तव हे आहे की, हृदयाचं आरोग्य केवळ बाहेरून दिसणाऱ्या फिटनेसवर अवलंबून नसतं. याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊया.

मणीपाल हॉस्पिटल (द्वारका) येथील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. समनजॉय मुखर्जी यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितलं की, "आपल्यापैकी बहुतेकांना असं वाटतं की योग्य आहार आणि थोडा व्यायाम आपल्याला हार्ट अटॅकपासून वाचवेल, पण हे पूर्ण सत्य नाही." प्रत्यक्षात, आपल्याला बाहेरून दिसणारा फिटनेस—जसं की योग्य वजन, चांगला स्टॅमिना किंवा तजेलदार त्वचा—हे केवळ वरवरचे संकेत आहेत. शरीराच्या आत चालणाऱ्या प्रक्रिया, जसे की इन्फ्लेमेशन, रक्तवाहिन्यांचं होणारं नुकसान किंवा हार्मोनल असंतुलन, बाहेरून दिसत नाहीत. हेच लपलेले घटक हळूहळू हार्ट अटॅकचा धोका वाढवतात.

थेट परिणाम हृदयावर

'इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' (ICMR) नुसार, भारतातील हृदयविकाराच्या एकूण प्रकरणांपैकी निम्म्याहून अधिक प्रकरणं ७० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील लोकांमध्ये दिसून येतात. याचा अर्थ असा की, वय किंवा फिटनेस ही पूर्ण सुरक्षिततेची हमी देत नाही. तणाव हे देखील एक मोठं पण दुर्लक्षित कारण आहे. तणाव नेहमी स्पष्टपणे दिसत नाही, तर तो कामाचा दबाव, अपुरी झोप आणि मानसिक ओझ्याच्या स्वरूपात शरीरावर परिणाम करतो. यामुळे ब्लड प्रेशर वाढतं आणि शरीरात जळजळ निर्माण होते, ज्याचा थेट परिणाम हृदयावर होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, सततचा तणाव हाय ब्लड प्रेशर आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढवतो.

'सायलेंट' आजाराचा धोका

अनुवंशिकता (Genetics) देखील महत्त्वाची भूमिका बजावते. जर तुमच्या कुटुंबात कमी वयात कोणाला हृदयविकार झाला असेल, तर तुमची जीवनशैली कितीही चांगली असली तरी तुमचा धोका वाढतो. हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह यांसारखे काही 'सायलेंट' आजारही शरीराला आतून इजा पोहोचवत असतात. 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ'च्या एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, मोठ्या संख्येने लोकांना त्यांच्या हाय ब्लड प्रेशरबद्दल माहितीच नसते.

झोपही आहे महत्त्वाची

हृदयाच्या आरोग्यासाठी पुरेशी झोप अत्यंत आवश्यक आहे. अपुरी किंवा खराब झोप हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम करू शकते, तणाव वाढवू शकते आणि मेटाबॉलिझ्म बिघडू शकतं. त्यामुळे केवळ बाहेरून फिट दिसणं पुरेसं नाही. वेळोवेळी ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्ट्रॉल आणि ईसीजी (ECG) यांसारख्या चाचण्या करणं गरजेचं आहे. जोखमीची योग्य वेळी ओळख करणं हाच हृदय सुरक्षित ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
 

Web Title : फिट दिखने वालों को हार्ट अटैक क्यों? डॉक्टरों ने बताए कारण।

Web Summary : फिटनेस ही सब कुछ नहीं। तनाव, आनुवंशिकी और गुप्त रोग जैसे छिपे कारक स्वस्थ दिखने वाले लोगों में भी हार्ट अटैक का खतरा बढ़ाते हैं। नियमित जांच जरूरी है।

Web Title : Heart attacks in fit people: Doctors reveal hidden causes.

Web Summary : Fitness isn't everything. Hidden factors like stress, genetics, and silent diseases increase heart attack risk, even in seemingly healthy individuals. Regular checkups are crucial.