'बिग बॉस मराठी ६'ची विजेती ठरल्यानंतर तन्वी कोलतेची पहिली पोस्ट, म्हणाली- "माझ्या हातात ही ट्रॉफी आहे, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 17:58 IST2026-04-24T17:58:06+5:302026-04-24T17:58:40+5:30

'बिग बॉस मराठी ६'ची विजेती ठरल्यानंतर तन्वी कोलते हिने पहिली पोस्ट शेअर केली आहे. 

bigg boss marathi 6 tanvi kolte shared first post after winning the trophy | 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती ठरल्यानंतर तन्वी कोलतेची पहिली पोस्ट, म्हणाली- "माझ्या हातात ही ट्रॉफी आहे, पण..."

'बिग बॉस मराठी ६'ची विजेती ठरल्यानंतर तन्वी कोलतेची पहिली पोस्ट, म्हणाली- "माझ्या हातात ही ट्रॉफी आहे, पण..."

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'च्या महाअंतिम सोहळ्यात तन्वी कोलते हिने ट्रॉफी उचलत विजेतेपदाचा मान पटकावला. तन्वी 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती ठरली. राकेश बापट आणि तन्वी कोलते 'बिग बॉस मराठी ६'चे टॉप २ होते. तन्वीने ट्रॉफीवर नाव कोरत विजेतेपद मिळवलं. 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती ठरल्यानंतर तन्वी कोलते हिने पहिली पोस्ट शेअर केली आहे. 

तन्वीने तिच्या सोशल मीडियावरुन 'बिग बॉस मराठी ६'च्या ट्रॉफीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने चाहत्यांचे आभार मानत भावना व्यक्त केल्या आहेत. तन्वी म्हणते, "आज माझ्या हातात ही ट्रॉफी आहे. पण ही फक्त माझी ट्रॉफी नाही, ही आपल्या सगळ्यांच्या विश्वासाची, प्रेमाची आणि आशीर्वादांची आहे. या प्रवासात मी खूप काही शिकले. कधी स्वतःवर विश्वास ठेवायला, कधी शांत राहून लढायला, आणि कधी पडूनही पुन्हा उभं राहायला…! तुमच्यापैकी प्रत्येकाने मला दिलेलं प्रेम, प्रत्येक vote, प्रत्येक message, मी सगळं मनापासून feel करतेय, अगदी रोज". 


"जेव्हा मी थकले, तुम्ही माझी ताकद बनलात. जेव्हा मी गोंधळले, तुम्ही माझा विश्वास बनलात आणि आज तुम्ही माझा अभिमान आहात. तन्वी कोलते आज इथे उभी आहे, कारण आपण सगळ्यांवी कधीच हार मानली नाही. ही फक्त जिंकण्याची गोष्ट नाही, 
हा ठरला माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्याचा आपला प्रवास...त्या प्रत्येकाला जे माझ्यासारखी स्वप्न बघतात, त्यांना एकच सांगायचंय…स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा, आणि जिद्द दाखवा…वेळ आल्यावर जग तुमच्यासाठी टाळ्या वाजवेल. ही ट्रॉफी…आपल्या सगळ्यांची आहे. परत एकदा मनापासून धन्यवाद. कायम माझ्यासोबत असेच उभे रहा", असं तन्वीने पुढे म्हटलं आहे. 

तन्वीसोबत राकेश बापट, विशाल कोटियन, अनुश्री माने, दिपाली सय्यद हे सदस्य 'बिग बॉस मराठी ६'चे टॉप ५ होते. राकेश बापट उपविजेता ठरला. तन्वीने पहिल्या दिवसापासूनच तिचा खेळ दाखवायला सुरुवात केली होती. तन्वी टास्कही उत्तम खेळायची. 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात ती दोनदा कॅप्टन झाली होती. ती विजेतेपदाची दावेदार होती. 

Web Title : बिग बॉस मराठी 6 जीतने के बाद तन्वी कोलते का पहला पोस्ट।

Web Summary : तन्वी कोलते ने बिग बॉस मराठी 6 जीता और सोशल मीडिया पर आभार व्यक्त किया। उन्होंने ट्रॉफी अपने प्रशंसकों को समर्पित की, उनके समर्थन को स्वीकार किया और अपनी यात्रा के दौरान सीखे गए सबक पर प्रकाश डाला। उन्होंने सपने देखने वालों के लिए आत्म-विश्वास और दृढ़ता पर जोर दिया।

Web Title : Tanvi Kolte's first post after winning Bigg Boss Marathi 6.

Web Summary : Tanvi Kolte won Bigg Boss Marathi 6 and shared her gratitude on social media. She dedicated the trophy to her fans, acknowledging their support and highlighting lessons learned during her journey. She emphasized self-belief and perseverance for dreamers.