"तिचं शरीर म्हणजे...", ७० वर्षीय अन्नू कपूर यांना तमन्ना भाटियाच्या बॉडीवर कमेंट करणं चांगलंच भोवलं, आता म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 16:29 IST2026-04-24T16:25:15+5:302026-04-24T16:29:00+5:30

"...तर मी तिची माफी मागेन", तमन्ना भाटियाच्या बॉडीवर केलेल्या 'त्या' कमेंटनंतर अन्नू कपूर यांचा यूटर्न; म्हणाले...

bollywood actor annu kapoor clarifies dudhiya badan remark on tamannaah bhatia over aaj ki raat song  | "तिचं शरीर म्हणजे...", ७० वर्षीय अन्नू कपूर यांना तमन्ना भाटियाच्या बॉडीवर कमेंट करणं चांगलंच भोवलं, आता म्हणतात...

"तिचं शरीर म्हणजे...", ७० वर्षीय अन्नू कपूर यांना तमन्ना भाटियाच्या बॉडीवर कमेंट करणं चांगलंच भोवलं, आता म्हणतात...

Annu Kapoor Tamannaah Bhatia Controversy:बॉलिवूड अभिनेते अन्नू कपूर हे त्यांच्या चित्रपटांसह अनेकदा वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. आजवर त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यान, २०२५ मध्ये  'आज की रात' गाणं पाहून अभिने्त्री तमन्ना भाटियाच्या बॉडीवरून  केलेल्या वक्तव्यामुळं सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. त्यानंतर अभिनेत्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.  ७० वर्षीय अभिनेत्याला अशी कमेंट करणं शोभतं का? असा सवाल ट्रोलर्सनी केला होता. अशातच आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अन्नू कपूर यांनी त्या प्रकरणी मौन सोडलं आहे.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अभिनेते म्हणाले, "गेल्या वर्षी अमेरिकेत माझे शो होते. मी माझ्या क्रिएटिव्ह टीमला म्हणालो, स्पर्धक चांगले आहेत, त्यामुळे गुगली टाकता येईल असं एखादं गाणं सुचवा. मग त्यांनी 'आज की रात' हे गाणं वाजवलं. मी म्हणालो, याचं संगीत खूप छान आहे.  त्या गाण्याबद्दल इतकंच आमचं बोलणं झालं होतं."

ऑनलाईन ट्रोलिंगवर स्पष्टीकरण देत म्हणाले...

ऑनलाइन ट्रोलिंगबद्दल बोलताना अन्नू कपूर म्हणाले,"माझ्या त्या वक्तव्यावरून लोकांनी मला शिव्या दिल्या, म्हाताऱ्याचं डोकं फिरलंय, असं म्हणाले.  मी फक्त दुधाळ फिगर म्हटल्याने एवढा मोठा वाद झाला. जर मी ते वाक्य इंग्रजीत बोललो असतो इतका वाद झालाच नसता. हिंदीत बोललो आणि लोकांचा गैरसमज झाला. आपलीच भाषा लोकांना जास्त टोचते, पण तेच इंग्रजीत म्हटलं तर काही वाटत नाही.  इंग्रजीमध्ये 'मिल्की बॉडी' सारखे शब्द सर्रास वापरले जातात. तिचं वय किती आहे – २८, ३० असेल. माझी मुलंही त्याच वयाची आहेत. मी फक्त 'दुधाळ शरीर' असं म्हटल्यामुळे, लोक मला म्हातारा म्हणायला लागले आणि ट्रोल करायला लागले." त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, त्यांच्या असं बोलण्याचा उद्देश कौतुक करणं हाच होता.

मी माफी मागायला तयार...

"मी माझ्या शब्दांवर ठाम आहे, पण जर माझ्या वक्तव्यामुळे तमन्नाला वाईट वाटले असेल किंवा तिचा अपमान झाला असेल, तर मी माफी मागायला तयार आहे. जर तिने मला विचारले की मी तसे बोललो का, तर मी म्हणेन, 'हो, मी बोललो.' जर तिला वाईट वाटले, तर मी तिचे पाय पकडून माफी मागेन.जर एका ७१ वर्षांच्या माणसाने तिच्या पायांना स्पर्श केला तर ती काय म्हणेल? काहीच नाही, कारण मी ते वक्तव्य कोणत्याही वाईट हेतूने करत नाही."

नेमकं काय म्हणालेले?

एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अन्नू कपूर यांनी तमन्ना भाटियाचे कौतुक करताना तिच्या शरीराचा उल्लेख दुधासारखे शुभ्र शरीर असा केला. अभिनेत्रीबद्दल अन्नू कपूर यांचे विनोद इथेच थांबले नाहीत. खरेतर, होस्टने अन्नू कपूर यांना विचारले की त्यांना तमन्नाचे 'आज की रात' गाणे आवडले का, तेव्हा अन्नू कपूर यांनी लगेच उत्साहाने उत्तर दिले, "माशाअल्लाह काय दुधाळ शरीर आहे." असं म्हटलं होतं. आता या सगळ्यावर त्यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली आहे.

Web Title : तम्मना भाटिया पर अन्नू कपूर की टिप्पणी से विवाद, माफी मांगने को तैयार।

Web Summary : अन्नू कपूर की तम्मना भाटिया के शरीर पर टिप्पणी से विवाद हुआ। उन्होंने कहा कि उनके शब्दों को गलत समझा गया, और यदि उन्हें बुरा लगा तो माफी मांगने को तैयार हैं, स्पष्ट किया कि यह प्रशंसा के रूप में था।

Web Title : Annu Kapoor's body shaming comment on Tamannaah Bhatia sparks controversy.

Web Summary : Annu Kapoor's comment about Tamannaah Bhatia's body sparked outrage. He claims his words were misinterpreted, offering an apology if she was offended, clarifying it was intended as a compliment.