Sachin Tendulkar Birthday : विसरु नका सचिनचा सल्ला, लोक दगडंही मारतील-पण यशाला शॉर्टकट नसतोच..

Updated:April 24, 2026 16:58 IST2026-04-24T16:49:18+5:302026-04-24T16:58:39+5:30

Sachin Tendulkar Birthday: Don't forget Sachin's advice, people will throw stones - but there is no shortcut to success : सचिन तेंडुलकरने दिलेले काही मोलाचे सल्ले.

Sachin Tendulkar Birthday : विसरु नका सचिनचा सल्ला, लोक दगडंही मारतील-पण यशाला शॉर्टकट नसतोच..

सचिन तेंडुलकरचा वाढदिवस. एक हाडामासाचा माणूस जगभरात क्रिकेट रसिकांच्या गळ्यातला ताईत होतो. केवळ आपली मेहनत आणि गुणवत्ता यांच्या जोरावर जिद्दीनं आल्या परिस्थितीचा सामना करतो. आणि त्याचा खेळ पाहून करोडो लोकांचं जगणं चार घटका आनंदाचं होतं असा खेळाडू. खेळाडूंनीच नाही तर प्रत्येकानं, प्रत्येक मुलानं, पालकानं आणि प्रोफेशनल्सनीही त्याच्याकडून शिकावं असं बरंच काही आहे.

Sachin Tendulkar Birthday : विसरु नका सचिनचा सल्ला, लोक दगडंही मारतील-पण यशाला शॉर्टकट नसतोच..

सचिनचं एक गाजलेलं वाक्य आहे. “People throw stones at you and you convert them into milestones.” लोक दगडं मारतात, नावं ठेवतात पण त्या दगडांचं मैलाच्या दगडात रुपांतर आपल्या कामानं करत राहणं एवढंच आपल्या हातात आहे.

Sachin Tendulkar Birthday : विसरु नका सचिनचा सल्ला, लोक दगडंही मारतील-पण यशाला शॉर्टकट नसतोच..

सचिनचा मुलगा अर्जुन क्रिकेटच्या जगात आपलं नाणं सिद्ध करण्यासाठी धडपडतो आहे. मॅच खेळत नसताना आनंदानं पाण्याच्या बाटल्याही वाहतो आहे. त्यालाही त्याच्या वडिलांनी एकच सल्ला दिला होता, “Chase your dreams, but make sure you don’t find shortcuts.” कष्ट कर, शॉर्टकट शोधू नकोस हेच यशाचं पहिलं गमक.

Sachin Tendulkar Birthday : विसरु नका सचिनचा सल्ला, लोक दगडंही मारतील-पण यशाला शॉर्टकट नसतोच..

सचिनच्या डोक्यात कधीही यशाची हवा गेली नाही. कसले ॲटिट्यूड त्याला शिवले नाहीत. तो म्हणतो माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं नम्र राहा. कायम पाय जमिनीवर ठेव. “If you remain humble, people will give you love and respect even after you have finished with the game.”

Sachin Tendulkar Birthday : विसरु नका सचिनचा सल्ला, लोक दगडंही मारतील-पण यशाला शॉर्टकट नसतोच..

स्वप्न पाहा आणि त्या वाटेवर कष्टानं चाला, हे वाक्य तसं नेहमीचं. पण एका मध्यमवर्गीय प्राध्यापकाच्या लेकानं ते खरं करुन दाखवलं. त्यानं अनेकांना स्वप्न पाहण्याची हिंमत दिली. तो कायम सांगतो, “Don’t stop chasing your dreams, because dreams do come true.”

Sachin Tendulkar Birthday : विसरु नका सचिनचा सल्ला, लोक दगडंही मारतील-पण यशाला शॉर्टकट नसतोच..

सचिनची गुणवत्ता वादातीत, परमेश्वरी वरदान. पण शिस्त नसेल तर गुणवत्ता वाया जाते. सचिनने गुणवत्तेला मेहनत, सातत्य आणि नम्रपणाचं कोंदण घातलं. तो आजही तेच सांगतो, “Success is a process…’