पहिलं लग्न तेव्हा झाली घरगुती हिंसाचाराची शिकार, आता ४० वर्षीय अभिनेत्रीला दुसऱ्यांदा थाटायचाय संसार, कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 16:12 IST2026-04-24T16:02:11+5:302026-04-24T16:12:17+5:30
पहिलं लग्न झाला तेव्हा घरगुती हिंसाचार झाला आणि घटस्फोट झाला. पुढे प्रेमात विश्वासघात मिळाला. आता ४० वर्षीय अभिनेत्रीने दुसऱ्यांदा लग्न करण्याची इच्छा केली व्यक्त

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई ही सर्वांची लाडकी अभिनेत्री. रश्मीला आपण विविध रिअॅलिटी शो, मालिका आणि सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. रश्मीला आता ४० व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न करण्याची इच्छा आहे.

रश्मी ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. वयाच्या २५ व्या वर्षी रश्मीने पहिलं लग्न केलं होतं. परंतु त्यामुळे रश्मीच्या करिअरला ब्रेक लागला.

परंतु रश्मीला पहिल्या लग्नात खूप त्रास झाला. तिला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला. त्यामुळे लग्नाच्या ५ वर्षांनी रश्मीला पतीपासून घटस्फोट घेतला.

त्यानंतर रश्मी बिग बॉस मध्ये सहभागी होती. तिथे तिने एका व्यक्तीसोबत खुलेआम लग्नाचं प्लॅनिंग केलं होतं. परंतु त्या व्यक्तीचं आधीच लग्न झाल्याचं उघड झालं आणि रश्मीचा मोठा विश्वासघात झाला.

रश्मी देसाई सध्या मनोरंजन विश्वात सक्रीय आहे. तिने स्वतःचं पॉडकास्ट चॅनलही सुरु केलं आहे. याचवेळी एका मुलाखतीत रश्मीने दुसऱ्यांदा लग्न केल्याचा विचार सांगितला आहे.

रश्मीला 'उतरन' मालिकेतून चांगली लोकप्रियता मिळाली. याशिवाय हिंदी आणि भोजपुरी सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे.

रश्मी बिग बॉस १३ मध्ये सहभागी होती. यावेळी रश्मी आणि सिद्धार्थ शुक्लामध्ये मोठी खडाजंगी झाली होती. रश्मी झळकलेला बिग बॉसचा हा सीझन आजही टॉप सीझनपैकी एक ओळखला जातो.

















