तीन वर्षांनंतर कमबॅक करणार शाहरुख खान, 'किंग'ची रिलीज डेट कन्फर्म; शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 15:48 IST2026-04-24T15:47:37+5:302026-04-24T15:48:07+5:30
काही दिवसांपूर्वी 'किंग'चं पहिलं टीझर समोर आलं होतं. याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.

तीन वर्षांनंतर कमबॅक करणार शाहरुख खान, 'किंग'ची रिलीज डेट कन्फर्म; शेअर केला व्हिडीओ
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसाठी २०२३ हे वर्ष खूप खास होतं. एकाच वर्षात त्याने सलग ३ ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. वर्षाच्या सुरुवातीला 'पठाण'मधून त्याने चार वर्षांचा गॅप भरुन काढत दणक्यात कमबॅक केलं. काही महिन्यांनी त्याचा 'जवान' सिनेमा आला. तर वर्षाच्या शेवटी 'डंकी'मधून त्याने धुमाकूळ घातला. त्यानंतर शाहरुख एकाही सिनेमात दिसला नाही. याचं कारण म्हणजे तो 'किंग'सिनेमाच्या तयारित व्यग्र होता. आता नुकतंच व्हिडीओ पोस्ट करत त्याने 'किंग'ची रिलीज डेट जाहीर केली आहे.
काही दिवसांपूर्वी 'किंग'चं पहिलं टीझर समोर आलं होतं. याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. आता शाहरुख खानचं प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेन्मेंटने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये शाहरुख खान जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. 'डर नही दहशत हूँ' हा त्याचा डायलॉग व्हायरल होत आहे. या व्हिडीओसोबत सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी ख्रिसमसच्या मुहुर्तावर २४ डिसेंबर रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
'किंग' सिनेमात शाहरुखसोबत त्याची लेक सुहानाही दिसणार आहे. बापलेक पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. तसंच सिनेमात अभिषेक बच्चन, अभय वर्मा, दीपिका पादुकोण यांच्याही भूमिका आहेत. . मीडिया रिपोर्टनुसार, किंग चित्रपटामध्ये जॅकी श्रॉफ एक महत्वाची भूमिका साकारताना दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु अद्याप चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.