इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 17:27 IST2026-04-24T17:26:56+5:302026-04-24T17:27:51+5:30

इन्स्टाग्रामवर फोटो अचानक ब्लॅक अँड व्हाईट का होत आहेत? हा तांत्रिक बिघाड कसा दुरुस्त करायचा आणि कंपनीचे यावर काय म्हणणे आहे? जाणून घ्या..

Big shock for Instagram users! Color photos turned black and white; Fix it in minutes, follow these easy steps | इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर सध्या एका विचित्र तांत्रिक बिघाडाने युजर्सना हैराण केले आहे. तुमचे रंगीबेरंगी फोटो अचानक जुन्या काळातील चित्रपटांप्रमाणे 'ब्लॅक अँड व्हाईट' दिसू लागले असतील, तर घाबरून जाण्याचे कारण नाही. तुमच्या फोनचा कॅमेरा किंवा स्क्रीन खराब झालेली नाही, तर हे इन्स्टाग्रामच्या सिस्टीममधील एका गडबडीमुळे घडत आहे.

नेमकी काय आहे ही भानगड?

गेल्या काही दिवसांपासून अनेक युजर्सनी तक्रार केली आहे की, त्यांच्या फीडमधील फोटो आपोआप कृष्णधवल म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट होत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, ही समस्या प्रामुख्याने HDR फोटोंच्या बाबतीत घडत आहे. ज्या फोटोंमध्ये अधिक रंग आणि डिटेल्स असतात, ते फोटो लोड होताना तांत्रिक अडचण येत असून ते रंगहीन दिसत आहेत. १८ आणि १९ एप्रिलच्या दरम्यान या समस्येचा फटका मोठ्या प्रमाणावर युजर्सना बसला आहे.

इन्स्टाग्रामने काय स्पष्टीकरण दिले?

हा प्रकार समोर आल्यानंतर इन्स्टाग्रामने अधिकृतपणे ही तांत्रिक चूक मान्य केली आहे. कंपनीने स्पष्ट केले की, हा एक 'बग' होता आणि तो सर्व अकाउंट्सवर नव्हता, तर काही निवडक युजर्सच्या फीडमध्येच ही समस्या जाणवत होती. आनंदाची बातमी अशी की, कंपनीने हा बिघाड आता दुरुस्त केल्याचा दावा केला आहे.

तुमचे फोटो अजूनही कोरेच दिसतायत? मग हे करा...

इन्स्टाग्रामने जरी समस्या सोडवल्याचे म्हटले असले, तरी काही युजर्सना अजूनही फोटो ब्लॅक अँड व्हाईट दिसत आहेत. अशा वेळी तुम्ही खालील सोप्या टिप्स वापरू शकता:

अ‍ॅप अपडेट करा: सर्वात आधी गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर जाऊन तुमचे 'इन्स्टाग्राम अ‍ॅप' अपडेट करा. नवीन व्हर्जनमध्ये असे बग्स फिक्स केलेले असतात.

अ‍ॅप रिस्टार्ट करा: एकदा अ‍ॅप पूर्णपणे बंद करा आणि पुन्हा सुरू करा. यामुळे तांत्रिक ग्लिच दूर होण्यास मदत होते.

कॅशे मेमरी क्लिअर करा: अँड्रॉइड युजर्स फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन इन्स्टाग्रामची 'कॅशे मेमरी' क्लिअर करू शकतात.

काही काळ वाट पाहा: कंपनीच्या म्हणण्यानुसार, फोटो हळूहळू मूळ रंगात परत येत आहेत. त्यामुळे थोडा धीर धरल्यास सिस्टीम स्वतःहून सर्व ठीक करेल.

तुमच्या आठवणींचे रंग कायम आहेत, फक्त इन्स्टाग्रामच्या सॉफ्टवेअरमध्ये थोडा बिघाड झाला होता जो आता निवळत आहे. त्यामुळे विनाकारण फोन दुरुस्त करायला धावू नका.

Web Title : Instagram में फोटो हुए ब्लैक एंड व्हाइट, ऐसे करें ठीक।

Web Summary : Instagram यूजर्स को फोटो ब्लैक एंड व्हाइट दिखने की समस्या हुई, खासकर HDR तस्वीरों में। Instagram ने माना कि बग था और इसे ठीक करने का दावा किया। यूजर्स ऐप अपडेट करें, रीस्टार्ट करें, कैश क्लियर करें या इंतजार करें।

Web Title : Instagram glitch turns photos black and white; quick fixes here.

Web Summary : Instagram users faced a bug causing photos to appear black and white, especially HDR images. Instagram acknowledged the issue and claims to have fixed it. Users can update the app, restart, clear cache, or wait for automatic correction.