"नुसतं चालणं अन् संध्याकाळी ६ नंतर...", 'या' मराठी अभिनेत्रीने केलंय तब्बल ६७ किलो वजन कमी, सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 18:00 IST2026-04-25T17:57:54+5:302026-04-25T18:00:45+5:30

मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! तब्बल ६७ किलो वजन केलं कमी, म्हणाली-"मी रोज रात्री..."

marathi actress aarti solanki lost 67kg weight talk about her fitness journey | "नुसतं चालणं अन् संध्याकाळी ६ नंतर...", 'या' मराठी अभिनेत्रीने केलंय तब्बल ६७ किलो वजन कमी, सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास

"नुसतं चालणं अन् संध्याकाळी ६ नंतर...", 'या' मराठी अभिनेत्रीने केलंय तब्बल ६७ किलो वजन कमी, सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास

Aarti Solanki : गेल्या काही दिवसात अनेक मराठी अभिनेत्रींनी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. डाएट, जिमच्या आधारे त्यांनी कमालीचं वजन घटवलं. अशीच एक अभिनेत्री म्हणजे आरती सोलंकी. विविध विनोदी भूमिकांसाठी आरती सोलंकी ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, अनेकदा अभिनेत्रीला वजनावरून ट्रोल करण्यात आलं. अखेर अभिनेत्रीने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून कोणाचाही विश्वास बसणं कठीण आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने कसं कमी केलं याबाबत सांगितलं आहे.

मालिका, सिनेमांचं चित्रीकरण, इतर कार्यक्रम असं सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक आरतीला वजन कमी करावंसं वाटलं. तिने त्या दिशेने गंभीर पावलं उचलायला सुरुवात केली. पण प्रवास सोपा नव्हता. अनेक अडचणी आल्या. १३२ किलोवरून तिने ६७ किलो वजन कमी केलं. नुकतीच तिने 'अभिजात मराठी फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्री तिची फिटनेस जर्नी सांगितली.ती म्हणाली," मी जवळपास ६७ किलो वगैरे वजन कमी केलं होतं. पण, आता नाटकाच्या तालमीमुळे मला चालायला वेळ मिळत नाही.  या ट्रान्सफॉर्मेशनसाठी मी पाच वर्ष मेहनत घेतली."

अभिनेत्रीने 'असं' केलं वजन कमी! 

मग अभिनेत्री म्हणाली, "नुसतं चालणं आणि संध्याकाळी सहानंतर  शक्यतो मी काहीच खात नाही. माझी दिनश्चर्या ठरलेली आहे. कधी जर भूक लागली तर मी सॅंडविच किंवा पाणीपूरी खाते. पण, कधीकधी तेही खाणं टाळते. शिवाय रोज रात्री ९ वाजता झोपायचं, असं माझं रुटिन आहे. आता मी एवढी सगळी मेहनत केल्यानंतर मला काहीतरी वेगळं करून दाखवयचं आहे." असं वक्तव्य अभिनेत्रीने या मुलाखतीत केलं.

Web Title: marathi actress aarti solanki lost 67kg weight talk about her fitness journey