बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत एन्जॉय करताना दिसली रिहाना, ओरीने शेअर केलेला पार्टीतील व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 18:05 IST2026-04-25T18:04:57+5:302026-04-25T18:05:35+5:30
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रिहानाने या इव्हेंटला हजेरी लावत लाइमलाइट लुटली. तिने फोटोसाठी पोझही दिल्या. या इव्हेंटनंतर झालेल्या पार्टीत रिहाना बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत मजा करताना दिसली.

बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत एन्जॉय करताना दिसली रिहाना, ओरीने शेअर केलेला पार्टीतील व्हिडीओ होतोय व्हायरल
वर्ल्ड फेमस पॉप सिंगर रिहाना काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा भारतात आली. रिहानाचे एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झाले होते. रिहाना फेंटी ब्युटी या इव्हेंटसाठी भारतात आली आहे. या इव्हेंटला तिने हजेरी लावली होती. या इव्हेंटमधील रिहानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रिहानाने या इव्हेंटला हजेरी लावत लाइमलाइट लुटली. तिने फोटोसाठी पोझही दिल्या. या इव्हेंटनंतर झालेल्या पार्टीत रिहाना बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत मजा करताना दिसली.
सोशल मीडिया सेन्सेशन असलेल्या ओरीनेही फेंटी ब्युटी इव्हेंटला हजेरी लावली होती. या इव्हेंटमधील एक व्हिडीओ त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रिहाना, ईशा अंबानी, जान्हवी कपूर आणि मनीष मल्होत्रा यांच्यासोबत औरीचे कॅन्डिड आणि मस्तीभरे क्षण टिपले गेले आहेत, जिथे सगळेच या सेलिब्रेशनचा आनंद घेताना दिसतात. या व्हिडीओत रिहानादेखील बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत एन्जॉय करताना दिसत आहे.
रिहानाचे या इव्हेंटमधील इतरही काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. या इव्हेंटमध्ये रिहानाने एका पापाराझीसोबत फोटो काढण्यासाठी पोझही दिली. रिहानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव झाला. रिहाना याआधी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यासाठी भारतात आली होती.