उन्हाळ्यात रोपं टवटवीत ठेवण्याचा सोपा उपाय- पानाफुलांनाही मिळेल थंडावा आणि राहतील फ्रेश
Updated:April 25, 2026 15:09 IST2026-04-25T15:05:19+5:302026-04-25T15:09:49+5:30

सध्या उन्हाचा कडाका एवढा वाढला आहे की त्यामुळे कुंडीत लावलेली रोपंही सुकून जात आहेत.(how to keep plants fresh in summer?)
रोज पाणी देऊनही रोपांची हवी तशी वाढ होत नाही. कारण या दिवसात रोपांनाही उष्णता सहन होत नाही.
ज्याप्रमाणे आपण डिहायड्रेशन टाळून शरीराला थंडावा मिळावा यासाठी ताक, नारळपाणी अशी पेयं घेत असतो, त्याचप्रमाणे रोपांनाही काही पदार्थ देणं आवश्यक असतं.
ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया.. त्यासाठी साधारण ५ लीटर पाणी घ्या. त्यामध्ये १ ग्लास ताक घाला.
यानंतर त्यामध्ये १ चमचा हळद घाला. आणि साधारण २० ते २५ ग्रॅम एवढा गूळ घाला.
हे पाणी पंधरा दिवसातून एकदा कुंडीतल्या मातीमध्ये घाला. तसेच रोपांवरही शिंपडा. यामुळे रोपांना नक्कीच थंडावा मिळेल. पानं हिरवीगार आणि टवटवीत राहतील.