प्रिया बापटला पाहताच छोट्या चाहत्याची रिअ‍ॅक्शन व्हायरल, VIDEO पाहून नेटकरीही झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 10:10 IST2026-04-26T10:04:44+5:302026-04-26T10:10:28+5:30

"मला प्रिया बापट काकूला भेटायचंय" चिमुकल्या शिवबाचा हट्ट पूर्ण; अभिनेत्रीला समोर पाहताच त्यानं जे केलं, तो VIDEO पाहून तुम्हीही हसाल

Priya Bapat Meets Little Fan Shivba Reaction Viral See Video Zee5 JAR Tarchi Goshta | प्रिया बापटला पाहताच छोट्या चाहत्याची रिअ‍ॅक्शन व्हायरल, VIDEO पाहून नेटकरीही झाले फिदा

प्रिया बापटला पाहताच छोट्या चाहत्याची रिअ‍ॅक्शन व्हायरल, VIDEO पाहून नेटकरीही झाले फिदा

Priya Bapat Meets Little Fan Shivba : अभिनेत्री प्रिया बापटला भेटण्यासाठी हट्ट करणाऱ्या शिवबा नावाच्या चिमुकल्याची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. 'हे काय नवीन' ही वेब सीरिज पाहिल्यानंतर शिवबाने प्रिया बापटला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. या भेटीचा व्हिडीओ 'झी ५'ने अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केला असून तो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात प्रिया बापटच्या 'जर तरची गोष्ट' या नाटकाचा प्रयोग होता. यावेळी शिवबा आपल्या आई-वडिलांसोबत नाटक पाहण्यासाठी आला होता. प्रयोग संपल्यानंतर त्याने बॅकस्टेजला जाऊन प्रियाची भेट घेतली. प्रियाला समोर पाहताच शिवबाने आनंदाच्या भरात आपल्या डोक्यावर हात मारला. त्याची ही निरागस प्रतिक्रिया पाहून उपस्थित सर्वजण भारावून गेले. यावेळी प्रियाने त्याच्याशी संवाद साधला आणि त्याला 'स्टार ऑफ द इयर' असे म्हटलं . प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरूनही या भेटीचे क्षण शेअर केला आहे.

प्रिया आणि शिवबाच्या भेटीचा अत्यंत गोड व्हिडिओ सध्या इंटरनेटवर सर्वांची मनं जिंकत आहे. या व्हिडीओवर 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरने कमेंट करत म्हटले, "त्याची रिअ‍ॅक्शन भारी आहे, त्याने डोक्यावर हात मारला". शिवबाच्या वडिलांनीही झी ५ आणि प्रिया बापटचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले की, "आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षणांपैकी एक... शिवबाला आयुष्यभर पुरेल हा अनुभव... खरंच, तुमचे खूप खूप आभार".


Web Title : प्रिया बापट के छोटे प्रशंसक की प्रतिक्रिया वायरल, नेटिज़न्स हुए प्रभावित।

Web Summary : छोटे शिवबा का सपना तब सच हो गया जब वह 'हे के नवीन' देखने के बाद अभिनेत्री प्रिया बापट से मिलना चाहता था। प्रिया से मिलने पर शिवबा की आश्चर्य और खुशी की मासूम प्रतिक्रिया ऑनलाइन दिल जीत रही है। प्रिया ने अपने इंस्टाग्राम पर इस मार्मिक पल को साझा किया।

Web Title : Priya Bapat's little fan's reaction goes viral, netizens are impressed.

Web Summary : Little Shivba's dream came true when he met actress Priya Bapat after wanting to meet her after watching 'Hey Kay Navin'. Shivba's innocent reaction of surprise and joy at meeting Priya is winning hearts online. Priya shared the touching moment on her Instagram.