गौरव मोरेने पत्नीसह दाखवली नव्या घराची झलक, मॉड्यूलर किचन, प्रशस्त हॉल, हटके नेमप्लेट अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 16:42 IST2026-04-26T16:37:00+5:302026-04-26T16:42:05+5:30

गौरव मोरेनं 'असं' सजवलं नवीन घर

गौरव मोरे हा प्रेक्षकांच्या मनात घर करणारा विनोदी कलाकार आहे. अलीकडेच गौरव आणि त्याची पत्नी प्रियंका यांनी त्याच्या नव्या घराची झलक प्रेक्षकांना दाखवली.

गौरव मोरेच्या घराची नेमप्लेट खूप खास आहे. आपली मुळे आणि जुना संघर्ष कायम लक्षात राहावा, यासाठी गौरवने आपल्या घराच्या दारावर 'फिल्टरपाड्याचा बच्चन' असे आकर्षक नाव लिहले आहे.

गौरव मोरेच्या घराची सुंदर व्हाईट थीम विशेष लक्ष वेधून घेत आहे. घरातील इंटेरियर अत्यंत आकर्षक असून हे पाहताच कोणीही या घराच्या प्रेमात पडेल.

गौरवच्या नव्या घराचा हॉल खूपच प्रशस्त आहे. गौरवने टीव्ही युनिटच्या बाजूला ट्रॉफी ठेवण्यासाठी खास कॉर्नर तयार करून घेतला आहे.

मुंबईतील पवई (MHADA) परिसरात त्याचे हे आलिशान २ BHK घर आहे. घराच्या मुख्य हॉलपासून ते बेडरूमपर्यंत प्रत्येक कोपऱ्यात एक शांतता आणि सौंदर्य जाणवतंय.

मास्टर बेडरूममध्ये भिंती आणि फर्निचरसाठी लाकडी व फिकट तपकिरी रंगांचा वापर केला आहे, ज्यामुळे रूम शांत आणि सुंदर दिसते.

गौरव मोरेच्या घरातील हे आधुनिक किचन दिसायला अतिशय स्टायलिश आणि प्रशस्त तर आहेच, पण ते वापरण्यासाठीही तितकेच सोयीचे आहे.

घरात मोठे डायनिंग टेबल ठेवल्यामुळे अनेकदा जास्त जागा अडली जाते, ही अडचण लक्षात घेऊन गौरव आणि प्रियांकाने किचनमध्येच एका बाजूला एक लहानसा आणि सुंदर 'डायनिंग एरिया' तयार केला आहे, ज्यामुळे जागेची बचत झाली असून किचनला एक वेगळाच लूक मिळाला आहे.

गौरव मोरेची पत्नी प्रियांकाबद्दल बोलायचं झाल्यास ती उत्तम अभिनेत्री आहे. तिनं साऊथ इंडस्ट्रीतही काम केलं असल्याची माहिती आहे. ( सर्व फोटो सौजन्य : गौरव मोरे इन्स्टाग्राम, Elements 5 Design Studio )

गौरव मोरेच्या घरात ध्यानस्थ मुद्रेत विराजमान असलेली गौतम बुद्धांची अत्यंत सुंदर मूर्ती पाहायला मिळते. या मूर्तीमुळे संपूर्ण घरात एक सकारात्मक ऊर्जा आणि शांतता जाणवते. तसेच, बुद्धांच्या मूर्तीसोबतच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोही तिथे लावलेला दिसतो.