आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 17:05 IST2026-04-26T17:04:52+5:302026-04-26T17:05:21+5:30

Vande Bharat Bullet Train Project: पुढील वर्षीपर्यंत वंदे भारत बुलेट ट्रेनचे प्रोटोटाइप येणार असून, बेंगळुरू ते चेन्नई अंतर केवळ ७३ मिनिटांत कापू शकेल. दिल्ली ते पाटणा अंतर ४ तासांत जाऊ शकेल, असे म्हटले जात आहे.

indian railway now to introduced vande bharat bullet train construction in bangalore by icf beml | आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!

आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!

Vande Bharat Bullet Train Project: स्वदेशी बनावटीची बी-२८ बुलेट ट्रेन बंगळूरुमध्ये तयार केली जाणार आहे. या ट्रेन आयसीएफ आणि बीईएमएल यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केल्या जाणार आहेत. या ट्रेनसाठी निर्मितीसाठी विशेष आदित्य कॉम्प्लेक्स विकसित करण्यात आले आहे. बंगळूरुमध्ये बुलेट ट्रेनच्या धर्तीवर एक कारखाना उभारण्यात आला आहे, जिथे २८० किलोमीटर प्रति तास इतका सर्वोच्च वेग गाठण्यास सक्षम असलेली वंदे भारत बुलेट ट्रेन तयार केली जात आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारखान्यात तयार झालेली पहिली प्रोटोटाइप ट्रेन पुढील वर्षी रुळांवर दिसेल.

हाय-स्पीड रेल्वे तंत्रज्ञान अत्यंत गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट आहे. देशांतर्गत त्याचा विकास हा स्वदेशी अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. नव्याने बांधलेला 'आदित्य' कॉम्प्लेक्स हा ICF आणि BEML यांच्याद्वारे संयुक्तपणे या ट्रेनचे उत्पादन करण्यासाठी विशेषतः तयार करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. तसेच दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या ट्रेन ताशी २५० किमी किंवा त्याहून अधिक वेगाने धावण्यासाठी बनवल्या जाणार आहेत. येथे तयार होणाऱ्या ट्रेन भविष्यात लोकांच्या प्रवासाच्या अनुभवात परिवर्तन घडवून आणतील अशी अपेक्षा आहे.

लूक वंदे भारत ट्रेनसारखा, वेग बुलेट ट्रेनसारखी

रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आदित्य विशेष संकुल आहे जो विशेषतः स्वदेशी अभियांत्रिकीचा वापर करून हाय-स्पीड ट्रेन्स, किंवा "बी-२८ ट्रेन्स" तयार करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. या कारखान्यात तयार होणाऱ्या बी-२८ ट्रेनला "वंदे भारत बुलेट ट्रेन" म्हटले जात आहे. हे नाव या वस्तुस्थितीमुळे दिले गेले आहे की, ही ट्रेन वंदे भारत ट्रेनसारखी दिसते, परंतु बुलेट ट्रेनच्या वेगाने धावणार आहे. रेल्वे मंत्रालयाने याला "आत्मनिर्भर भारताची स्वदेशी बुलेट ट्रेन" असे संबोधले आहे.

दरम्यान, वंदे भारत बुलेट ट्रेन बंगळूरु ते चेन्नई हा प्रवास ७३ मिनिटांत पूर्ण करेल. बंगळूरु आणि चेन्नई दरम्यान रेल्वेने ३५३ किलोमीटरचे अंतर आहे. शताब्दी एक्सप्रेसला हे अंतर कापायला ५.१५ तास लागतात. नियमित मेल/एक्स्प्रेस ट्रेनना साडेपाच ते सहा तास लागतात. रेल्वेमंत्र्यांनी दावा केला आहे की, बी२८ ट्रेन हे अंतर केवळ ७३ मिनिटांत पार करेल. याव्यतिरिक्त, दिल्ली ते पाटणा हे रेल्वेचे अंतर १००० किलोमीटर आहे. ही ट्रेन ताशी २५० किलोमीटर वेगाने धावली तरी, दिल्ली ते पाटणा हा प्रवास चार तासांत पूर्ण होऊ शकतो.

 

Web Title : बेंगलुरु में बनेगी वंदे भारत बुलेट ट्रेन: रेल की मेगा योजना!

Web Summary : भारत की वंदे भारत बुलेट ट्रेन, एक बी-28 मॉडल, का निर्माण बेंगलुरु में ICF और BEML द्वारा किया जाएगा। इस स्वदेशी बुलेट ट्रेन का लक्ष्य 280 किमी प्रति घंटे की गति है, जो संभावित रूप से बेंगलुरु-चेन्नई को 73 मिनट में पूरा कर सकती है। उत्पादन एक विशेष रूप से निर्मित 'आदित्य' कॉम्प्लेक्स में चल रहा है।

Web Title : Vande Bharat Bullet Train to be built in Bengaluru: Mega Rail Plan!

Web Summary : India's Vande Bharat Bullet Train, a B-28 model, will be manufactured in Bengaluru by ICF and BEML. This indigenous bullet train aims for speeds of 280 kmph, potentially completing Bengaluru-Chennai in 73 minutes. Production is underway at a specially built 'Aditya' complex.