सख्ख्या भावासोबत केलेला ऑनस्क्रीन रोमान्स, बरबाद झालं करिअर; वादात अडकलेली बॉलिवूडची हसीना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 16:54 IST2026-04-26T16:50:09+5:302026-04-26T16:54:18+5:30

बॉलिवूडची एक अशी हसीना जिने ७०चं दशक गाजवलं. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम डान्सरही होती. पण, एका कॉन्ट्रोव्हर्सीमुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली.

बॉलिवूडची एक अशी हसीना जिने ७०चं दशक गाजवलं. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम डान्सरही होती. पण, एका कॉन्ट्रोव्हर्सीमुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली.

या अभिनेत्रीचं नाव होतं मीनू मुमताज. मीनू यांचे वडील मुमताज अली एक डान्सर आणि अभिनेता होते. मात्र वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे कुटुंबाची जबाबदारी मीनू यांच्यावर येऊन पडली.

वडिलांसोबत मीनूदेखील लाइव्ह शोमध्ये स्टेजवर डान्स करू लागल्या. त्यानंतर अवघ्या १३व्या वर्षी १९५५ साली त्यांनी सखी हकीम सिनेमातून पदार्पण केलं.

१९५६ साली प्रदर्शित झालेल्या CID सिनेमाने त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये त्या दिसल्या.

मीनू यांचा मोठा भाऊ महमूद अलीदेखील एक प्रसिद्ध कॉमेडियन होते. हावडा ब्रिज या सिनेमात हे दोघे भाऊ-बहीण एकत्र दिसले होते.

सिनेमातील 'गोरा रंग चुनरिया काली' या गाण्यात मीनू आणि त्यांचा भाऊ महमूद यांनी ऑनस्क्रीन रोमान्स केला होता. ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

त्यानंतर १९६३ साली सैयद अली अकबर यांच्याशी मीनू यांनी विवाह केला आणि बॉलिवूडला रामराम केला. काही काळानंतर त्या कॅनडा येथे वास्तव्यास होत्या.

२००३ मध्ये त्यांची स्मृती गेली. तेव्हा त्यांच्या मेंदूत ट्युमर आढळला होता. २३ ऑक्टोबर २०२१ रोजी मीनू मुमताज यांचं ७९व्या वर्षी निधन झालं.