प्रेग्नन्सीमध्येही दीपिका पादुकोण करतेय ॲक्शन सीन्स, 'राका'चं शूटिंग सुरू; सेटवरील फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 12:51 IST2026-04-28T12:34:08+5:302026-04-28T12:51:40+5:30

'राका' चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

Deepika Padukone Raka Movie Action Scenes Pregnancy Shooting Updates Allu Arjun Atlee | प्रेग्नन्सीमध्येही दीपिका पादुकोण करतेय ॲक्शन सीन्स, 'राका'चं शूटिंग सुरू; सेटवरील फोटो आले समोर

प्रेग्नन्सीमध्येही दीपिका पादुकोण करतेय ॲक्शन सीन्स, 'राका'चं शूटिंग सुरू; सेटवरील फोटो आले समोर

बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पादुकोण सध्या तिच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीमुळे चर्चेत आहे.  प्रेग्नन्सीच्या काळातही दीपिकाने आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केलेले नाही. प्रसिद्ध दिग्दर्शक ॲटलीच्या आगामी 'राका' या चित्रपटात दीपिका एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, प्रेग्नन्सी असूनही चित्रपटातील तिच्या दमदार ॲक्शन सीन्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

'राका' चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे, विशेषतः दीपिका आणि साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन यांची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात दीपिकाची एन्ट्री अत्यंत धमाकेदार असून अल्लू अर्जुनसोबत तिचा एक मोठा ॲक्शन सिक्वेन्स आहे. यातील कठीण स्टंट्ससाठी 'बॉडी डबल'ची मदत घेतली जाणार असली, तरी दीपिका स्वतः सर्व ड्रामॅटिक आणि भावनिक सीन्सचे शूटिंग पूर्ण करणार आहे.

'राका'सोबतच दीपिका 'किंग'मध्येही झळकणार

प्रोडक्शन हाऊसशी संबंधित सूत्रांनी स्पष्ट केले आहे की, "दीपिका या चित्रपटाच्या कथानकाचा कणा आहे. तिच्या प्रेग्नन्सीमुळे कथेमध्ये किंवा तिच्या भूमिकेच्या लांबीमध्ये कोणतीही कपात केलेली नाही. ती जशी आहे तशीच प्रभावी राहील". 'जवान'च्या ब्लॉकबस्टर यशानंतर दिग्दर्शक ॲटली आता 'राका'च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहेत. दीपिकाचा ॲक्शन अवतार प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी ठरणार आहे. 'राका' सोबतच दीपिका 'किंग' या चित्रपटाच्या शुटिंगमध्येही व्यस्त आहे. शाहरुखच्या किंग चित्रपटातही ती महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

Web Title : प्रेग्नेंसी में भी दीपिका पादुकोण का एक्शन, 'राका' की शूटिंग जारी

Web Summary : प्रेग्नेंसी के बावजूद, दीपिका पादुकोण अल्लू अर्जुन के साथ 'राका' के लिए एक्शन दृश्यों की शूटिंग जारी रखे हुए हैं। उनकी भूमिका महत्वपूर्ण है, केवल चुनौतीपूर्ण स्टंट्स के लिए बॉडी डबल का उपयोग किया जा रहा है।

Web Title : Pregnant Deepika Padukone Films Action Scenes for 'Raaka'; Photos Surface

Web Summary : Despite her pregnancy, Deepika Padukone continues filming action scenes for 'Raaka' with Allu Arjun. Her role remains pivotal, with only challenging stunts using a body double.