Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >बँकिंग > Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न

Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न

Bank of Baroda Schemes: बँक ऑफ बडोदा ही भारतातील प्रमुख सरकारी बँकांपैकी एक आहे. बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना एफडी म्हणजेच मुदत ठेव योजनेवर भरघोस व्याज देत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 13:43 IST2026-04-28T13:36:32+5:302026-04-28T13:43:02+5:30

Bank of Baroda Schemes: बँक ऑफ बडोदा ही भारतातील प्रमुख सरकारी बँकांपैकी एक आहे. बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना एफडी म्हणजेच मुदत ठेव योजनेवर भरघोस व्याज देत आहे.

Deposit rs 100000 in Bank of Baroda and get fixed interest of rs 51644 bumper returns with government guarantee | Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न

Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न

Bank of Baroda Schemes: बँक ऑफ बडोदा ही भारतातील प्रमुख सरकारी बँकांपैकी एक आहे. बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना एफडी म्हणजेच मुदत ठेव योजनेवर भरघोस व्याज देत आहे. या सरकारी बँकेचे ग्राहक अवघ्या ७ दिवसांच्या कालावधीसाठी देखील एफडी खातं उघडू शकतात. बँक ऑफ बडोदामध्ये जास्तीत जास्त १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडी खातं उघडता येतं. आज आम्ही तुम्हाला बँक ऑफ बडोदाच्या अशा एका एफडी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये केवळ १ लाख रुपये जमा करून ५१,६४४ रुपयांपर्यंतचं निश्चित आणि बंपर व्याज मिळवता येतं.

विविध कालावधीसाठीचे व्याजदर

बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीच्या एफडी खात्यांवर ३.५० टक्क्यांपासून ७.०५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. बँकेत ७ ते ४५ दिवसांच्या एफडी योजनेवर ३.५० टक्के ते ४.०० टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे. त्याचप्रमाणे, ४६ ते ६० दिवसांच्या कालावधीसाठी ५.०० टक्के ते ५.५० टक्के, १८१ ते २१० दिवसांच्या कालावधीसाठी ५.५० टक्के ते ६.०० टक्के आणि ५ वर्षे ते १० वर्षांपर्यंतच्या एफडी योजनेवर ६.०० टक्के ते ७.०० टक्क्यांपर्यंत व्याज दिलं जात आहे.

रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?

₹५१,६४४ पर्यंतचं निश्चित व्याज मिळणार

ही प्रमुख सरकारी बँक ६ वर्षे म्हणजेच ७२ महिन्यांच्या एफडी योजनेवर सामान्य नागरिकांना ६.०० टक्के व्याज देत आहे. तर, याच कालावधीच्या एफडी खात्यांवर ज्येष्ठ नागरिक आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.०० टक्क्यांचा शानदार परतावा मिळत आहे. 

सामान्य नागरिकांसाठी : बँक ऑफ बडोदाच्या ७२ महिन्यांच्या एफडी योजनेत १ लाख रुपये जमा केल्यास, सामान्य नागरिकांना मॅच्युरिटीवर ४२,९५० रुपयांच्या निश्चित व्याजासह एकूण १,४२,९५० रुपये मिळतील.

ज्येष्ठ नागरिकांसाठी : जर एखादा ज्येष्ठ नागरिक किंवा अति ज्येष्ठ नागरिक ७२ महिन्यांच्या एफडी योजनेत १ लाख रुपये जमा करत असेल, तर त्यांना मॅच्युरिटीवर ५१,६४४ रुपयांच्या निश्चित व्याजासह एकूण १,५१,६४४ रुपये मिळतील.

Web Title : Bank of Baroda FD: ₹1 लाख जमा करें, ₹51,644 निश्चित ब्याज पाएं

Web Summary : बैंक ऑफ बड़ौदा आकर्षक एफडी दरें प्रदान करता है, जो 7.05% तक है। 72 महीने की एफडी में ₹1 लाख का निवेश करने पर सामान्य नागरिकों को ₹42,950 और वरिष्ठ नागरिकों को परिपक्वता पर ₹51,644 मिलते हैं, जिससे सरकारी गारंटी के साथ शानदार रिटर्न सुनिश्चित होता है।

Web Title : Bank of Baroda FD: Invest ₹1 Lakh, Get ₹51,644 Fixed Interest

Web Summary : Bank of Baroda offers attractive FD rates, up to 7.05%. Investing ₹1 lakh in a 72-month FD yields ₹42,950 for general citizens and ₹51,644 for senior citizens upon maturity, ensuring bumper returns with government guarantee.