'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 13:15 IST2026-04-28T12:50:34+5:302026-04-28T13:15:29+5:30

Ajit Pawar Death News: महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज तीन महिने पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज आणखी काही सनसनाटी माहिती समोर आणली आहे.

On Ashok Kharat's advice, a leader in Baramati performed puja outside Ajitdada's house, Rohit Parav's big revelation | 'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट

'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज तीन महिने पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज आणखी काही सनसनाटी माहिती समोर आणली आहे. २८ जानेवारी रोजी झालेल्या अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूपूर्वी भोंदू अशोक खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने अजित पवार यांच्या घराबाहेर आणि शेतात पूजा केली होती, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

या संदर्भात आज प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी सांगितले की, या प्रकरणात खरातचा जो अँगल आहे तो सीआयडीने हाती घेतला नव्हता, तो हाती घ्यावा अशी मागणी करण्यासाठी मी येथे आलो आहे. अजितदादांच्या काटेवाडीत असलेल्या घराजवळील शेतात एक विहीर आहे. या विहिरीजवळ असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या झाडाला २८ तारखेपूर्वी एक बकरी मारून आणि पूजा करून टांगून ठेवण्यात आली होती. आता तिथे फक्त बकरीची हाडं आणि काही मांस शिल्लक आहे.

बारामतीमधील एक छोटा नेता होता खरातच्या संपर्कात
रोहित पवार यांनी पुढे सांगितले की,  आम्हाला जी माहिती मिळाली आहे. त्या माहितीनुसार बारामतीमधील एक छोटा नेता आहे. तो खरातच्या सातत्याने संपर्कात होता. तसेच अजितदादांच्या पक्षातील जे नेते खरातच्या संपर्कात होते. त्या लोकांसोबत या छोट्या नेत्याचे आर्थिक संबंध आहेत. काटेवाडी येथील घरात काम करणाऱ्या कामगारांचे पगार देण्यामध्ये या नेत्याचा सहभाग आहे, असे आम्हाला कळले आहे. तसेच अजितदादांच्या काटेवाडीमधील घराची आणि सहयोग येथे असलेल्या घराची पूजा ही या छोट्या नेत्याच्या माध्यमातून करण्यात आली, असं आम्हाला कळलं आहे.

दरम्यान, आम्ही काळ्या जादूवर विश्वास ठेवत नाही. आम्ही भोंदूगिरीवर विश्वास ठेवत नाही. मात्र या मागचा हेतू काय होता. तसेच दादांच्या काटेवाडी येथील घर, सहयोगमधील घर आणि देवगिरी बंगला या तिन्ही घरांबाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या. मग खरातच्या खात्यामध्ये २७, २८ आणि २९ जानेवारी रोजी उलाढाल का वाढली, असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला.

पुढच्या काही दिवसांमध्ये पवार कुटुंबावर फार मोठा आघात होईल, खरातनं केलं होतं भाकित
तसेच एक शेतकरी अशोक खरात याला २६ की २७ जानेवारी रोजी भेटला होता. तसेच पवार कुटुंबावर असलेल्या प्रेमापोटी त्याने पवार कुटुंबातील सारं काही नीट होईल का, असे त्याने अशोक खरातला विचारले. तेव्हा पुढच्या काही दिवसांमध्ये पवार कुटुंबावर फार मोठा आघात होईल, किंवा अडचण निर्माण होईल, असे अशोक खरातने त्या शेतकऱ्याला सांगितल्याचं आम्हाला कळलं आहे. आता या सर्वामध्येही सीआयडीन चौकशी करावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली आहे.

Web Title: On Ashok Kharat's advice, a leader in Baramati performed puja outside Ajitdada's house, Rohit Parav's big revelation