६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 14:07 IST2026-04-28T14:06:08+5:302026-04-28T14:07:11+5:30

Vivo Y600 Launched: विवो कंपनीने १०,२०० एमएएच क्षमतेची बॅटरी असलेला स्मार्टफोन लॉन्च करून बाजारात खळबळ उडवून दिली.

Vivo Y600 Launched In China, Know Price And Specification | ६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!

६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!

स्मार्टफोन जगतात बॅटरी बॅकअपच्या बाबतीत विवो कंपनीने एक मोठा टप्पा गाठला आहे. कंपनीचा नवा स्मार्टफोनविवो वाय ६०० प्रो चीनमध्ये लॉन्च झाला आहे. यात १०,२०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना हा फोन वारंवार चार्जिंगला लावण्याची गरज भासणार नाही. विवोच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी असल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर, हा फोन अवघ्या ८० मिनिटांत चार्ज पूर्ण चार्ज होईल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. 

विवो वाय ६०० प्रो: डिस्प्ले

या फोनमध्ये ६.८३ इंचाचा १.५K OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो १२०Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी यात मीडियाटेक डायमेन्सिटी ७३००e (MediaTek Dimensity 7300e) चिपसेट वापरण्यात आला आहे. हा फोन १२ जीबीपर्यंत रॅम आणि ५१२ जीबीपर्यंतच्या अंतर्गत स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

विवो वाय ६०० प्रो: कॅमेरा

फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असलेला ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. 

विवो वाय ६०० प्रो: कनेक्टिव्हिटी

हा फोन फ्लोटिंग गोल्ड, ब्राइट मून ब्लॅक, वास्ट ब्लू आणि स्टारी पर्पल अशा चार आकर्षक रंगांत लॉन्च करण्यात आला आहे. या फोनला IP68 आणि IP69 रेटिंग मिळाले आहे, ज्यामुळे तो पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहतो. इतकी मोठी बॅटरी असूनही फोनची जाडी केवळ ८.१५ मिमी आहे.

विवो वाय ६०० प्रो: किंमत

चीनमध्ये या फोनची सुरुवातीची किंमत सुमारे १ हजार ९९९ ते २ हजार २९९ युआनच्या दरम्यान (भारतीय चलनात अंदाजे २३,००० ते २७,००० रुपये) असू शकते. भारतात हा फोन कधी लॉन्च होणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र लवकरच तो भारतीय बाजारात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title : विशाल बैटरी और AMOLED डिस्प्ले के साथ Vivo Y600 लॉन्च

Web Summary : Vivo Y600 Pro चीन में 10,200mAh बैटरी और 6.83 इंच AMOLED डिस्प्ले के साथ लॉन्च हुआ। इसमें मीडियाटेक डाइमेंसिटी 7300e, 50MP कैमरा और IP68/IP69 रेटिंग है। चीन में कीमत लगभग ₹23,000 से शुरू; भारत में जल्द लॉन्च होने की उम्मीद।

Web Title : Vivo Y600 Launched with Massive Battery and AMOLED Display

Web Summary : Vivo Y600 Pro launches in China with a 10,200mAh battery and 6.83-inch AMOLED display. It features MediaTek Dimensity 7300e, a 50MP camera, and IP68/IP69 rating. Price starts around ₹23,000 in China; India launch expected soon.