“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 13:33 IST2026-04-28T13:33:09+5:302026-04-28T13:33:48+5:30

Raghav Chaddha : नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी राघव यांच्या भाजपा प्रवेशाबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

Raghav Chaddha joins bjp Priyanka Chopra help revealed navjot singh sidhu wife Parineeti chopra | “प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा

फोटो - आजतक

राघव चड्ढा यांनी आम आदमी पार्टी (AAP) सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राघव चड्ढा यांचा हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक आहे. काही लोक त्यांच्या या निर्णयावर आनंदी आहेत, तर काही जण नाराज दिसत आहेत. याच दरम्यान नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी राघव यांच्या भाजपा प्रवेशाबाबत एक मोठा दावा केला आहे.

'टॉप सीक्रेट' या पॉडकास्टमध्ये बोलताना नवज्योत कौर सिद्धू यांनी राघव चड्ढा यांच्या भाजपा प्रवेशाचं कारण सांगितलं. त्या म्हणाल्या की, प्रियंका चोप्रामुळे राघव भाजपामध्ये सामील झाले. त्या पुढे सांगतात की, प्रियंका चोप्राला हे समजलं होतं की, आम आदमी पार्टीचे लोक राघव यांच्या मागे लागले आहेत आणि आता राघव यांच्यावर ईडीची (ED) कारवाई होईल. नवज्योत कौर सिद्धू यांनी दावा केला की, प्रियंका चोप्राने आपली बहीण परिणीती चोप्रा हिच्यासाठी राघव चड्ढा यांना वाचवलं आहे.

"आवाज उठवला पाहिजे”

नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीने असंही म्हटलं की, राघव चड्ढा आम आदमी पार्टी सोडणार आहेत हे त्यांना आधीच समजलं होतं. पार्टीला असं वाटू लागलं होतं की राघव आपल्यासाठी बोलत नाहीत, त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला. मी हे सांगू इच्छिते की, प्रत्येक शांत राहणारा माणूस हा पक्षाचाच भाग असतो. राघव चड्ढा आज चार वर्षांनंतर जे बोलत आहेत, ते त्यांनी दीड वर्षांपूर्वीच बोलायला हवं होतं. जर काही चुकीचं वाटत असेल, तर त्याच वेळी आवाज उठवला पाहिजे.

फॉलोअर्स झाले कमी

राघव चड्ढा यांचा भाजपा प्रवेश अनेकांना खटकत आहे. भाजपामध्ये प्रवेश केल्याच्या अवघ्या एक दिवसानंतर राघव चड्ढा यांचे इन्स्टाग्रामवरील २० लाखांहून (२ मिलियन) अधिक फॉलोअर्स कमी झाले आहेत. कुनिका सदानंद आणि प्रकाश राज यांसारख्या सेलिब्रिटींनी राघव चड्ढा यांच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. नवज्योत कौर सिद्धू यांनी राघव चड्ढा यांच्याबद्दल जे काही दावे केले आहेत, त्यावर अद्याप प्रियंका चोप्रा, परिणीती चोप्रा किंवा राघव चड्ढा यांपैकी कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Web Title : प्रियंका चोपड़ा के कारण राघव चड्ढा भाजपा में: सिद्धू की पत्नी का दावा।

Web Summary : नवजोत कौर सिद्धू का दावा है कि प्रियंका चोपड़ा ने राघव चड्ढा के भाजपा में जाने को प्रभावित किया, ईडी की कार्रवाई के डर और परिणीति चोपड़ा की रक्षा के लिए। चड्ढा को आलोचना और फॉलोअर्स का नुकसान हुआ।

Web Title : Priyanka Chopra behind Raghav Chadha's BJP entry: Sidhu's wife claims.

Web Summary : Navjot Kaur Sidhu claims Priyanka Chopra influenced Raghav Chadha's BJP switch, fearing ED action and protecting Parineeti Chopra. Chadha faces backlash and follower loss.